अकोला:- येथील भिरडवाडी स्थित श्री संताजी इंग्लिश प्रायमरी व मिडल स्कूल मध्ये गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष माननीय श्री मंगेशजी वानखडे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. अध्यक्षांच्या हस्ते दीपपूजन सरस्वती पूजन व श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. वर्ग ८ वी च्या अर्जुन मानकर याने जगतगुरु द्रोणाचार्य व वेदांत अवातीरक याने एकलव्याची भूमिका सादर केली. शाळेच्या शिक्षिका अपर्णा देशमुख यांनी गुरूंची माहिती एकलव्याच्या गोष्टीतून आकारण्याची तर सौ पूजा भाकरे यांनी गुरूंची महती आपल्या संचलनातून विशद केली.
शाळेचे अध्यक्ष सर्वेसर्वा श्री मंगेश जी वानखडे सर यांनी गुरूंच्या महतीसह त्यांच्या शिक्षकांच्या काही आठवणी सांगितल्या तर मुख्याध्यापिकासव अश्विनी खोत कुटाफडे यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर भेटणाऱ्या व्यक्तींमध्ये व प्राण्यांमध्ये एक शिक्षक दडलेला असतो त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे असे प्रतिपादन केले. शाळेचे इन्चार्ज श्री विठ्ठल नांदुरकर यांनी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेतील शिक्षिका कू. ज्योती मॅडम, कु. राजे मॅडम, सौ कुलकर्णी मॅडम, सोबत कर मॅडम, कु. टाले मॅडम, कु. सोनवणे मॅडम, कू. कांबळे मॅडम, कु. बहुरूपी मॅडम, सौ ढोकणे मॅडम, सौ उगले मॅडम, सौ अकोटकर मॅडम, कु. भगत मॅडम, तसेच वाडेकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
तर शाळेच्या इतर कर्मचारी वर्ग अनुराधाताई, महेश दादा, शिरसाट सर यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी भाषणातून व गीतांमधून गुरूंचे महत्व विशद केले. तर काही शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सौ पूजा भाकरे मॅडम तर आभार प्रदर्शन संपर्क मॅडम यांनी केले कार्यक्रम उत्साहात पार पडला.