मा. संदेश आंबेडकरांच्या प्रवेशामुळे बहुजन जनता दलामध्ये आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात जुळणार, पंडितभाऊ दाभाडे
मुंबई दि, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि चुलत पणतू असलेले मा संदेश अशोकराव आंबेडकर यांनी बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांचे नेतृत्व स्वीकारून मंगळवार दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर झालेल्या कार्यक्रमांमध्ये बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्येआपल्या अनेक समर्थकांसह बहुजन जनता दलामध्ये जाहीर प्रवेश केला आहे संदेश आंबेडकर यांनी बहुजन जनता दलामध्ये जाहीर प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत बहुजन जनता चा संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले आणि पुढील कार्याला शुभेच्छा देऊन संदेश आंबेडकर यांच्याकडे लवकरच बहुजन जनता दलाकडून मोठी जबाबदारी देण्यात येईल
मा संदेश आंबेडकरांच्या बहुजन जनता दलामध्ये जाहीर प्रवेशामुळे महाराष्ट्रात बहुजन जनता दलामध्ये आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात जुळणार असुन बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि मोठा जोश आणि नवी दिशा संदेश आंबेडकरांच्या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांना मिळणार आहे असे मत बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले आहे ते मुंबई येथील आझाद मैदान येथे झालेल्या संदेश आंबेडकर पक्षप्रवेश कार्यक्रमांमध्ये बोलत होते
पुरोगामी महाराष्ट्रातील महापुरुषांचे वंशज लवकरच बहुजन जनता दलामध्ये प्रवेश करणार आहे त्यामधील काशीराम फुले (महात्मा ज्योतिबा फुले यांचे चुलत नातू, )(लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सौ सुनबाई )श्रीमती सावित्रीबाई साठे, (हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती तानाजी मालसुरे यांचे नातू )विष्णुजी मालसुरे, (वीर पुरुष फकिरा रानोजी साठे यांचे नातू )किरण साठे सर्व वंशज लवकरच बहुजन जनता दलामध्ये प्रवेश करणार आहे असेही पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले
. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिरामजी फुले (मा ज्योतिबा फुले यांचे नातू )आणि श्रीमती सावित्रीमाई साठे, (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई,) (किरण साठे वीर पुरुष फकिरा रानोजी साठे यांचे नातू) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर रामदास डोरले (नगरसेवक )केशव गंगणे (नगरसेवक) प्रमोदिनी ताई डावखरे( नगरसेविका )संजय डावखरे (सरपंच) दादू राम कोळी (सरपंच )इंदिराताई कामधेनु (ग्रामपंचायत सदस्य) शीलाताई बरकडे (ग्रामपंचायत सदस्य )तुकाराम खोतकरे (ग्रामपंचायत सदस्य )किशोर गावंडे (ग्रामपंचायत सदस्य) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन किशोर कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिक दाभाडे यांनी केले यावेळी महाराष्ट्रातील बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे कार्यक्रमाचे आयोजक आणि बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी वरील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे