महाराष्ट्र राज्यात ढगफुटी व अति मुसळधार पावसामुळे जिकडे तिकडे नदी, नाल्यांना पूर असल्यामुळे वाहतूक व्यवस्था पार ठप्प झाली आहे .
त्यामुळे 17 जुलै ला होणाऱ्या नीट परीक्षे संबंधी शासन कोणता निर्णय घेतो याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे.
दिनांक 20 जुलै ला होणारी स्कॉलरशिप परीक्षा ज्या प्रकारे शासनाने पुढे ढकलून 31 जुलै ला घेत आहेत त्या पद्धतीने शासनाने नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यां संबंधी योग्य निर्णय घ्यावा.
शासनाने वेळीच 17 जुलै ला होणाऱ्या नीट परीक्षेसंबंधी पावले उचलून विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर करावा.
राज्यातील बिघडलेल्या पूर परिस्थितीमुळे परीक्षेच्या ठिकाणी खेडेगावापासून ते शहरी भागातील जाणारे मार्ग बंद असल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पालकांना मनात भीती आहे की माझा पाल्य परीक्षेच्या ठिकाणी पोहचला नाही तर परीक्षेला मुकेल आणि त्याचे वर्ष वाया जाईल . आपल्या पाल्यावर त्याने केलेला खर्च सुद्धा पाण्यात बुडेल..?
नीट परीक्षेला बसणारे बरेचसे विद्यार्थी हे शहरा पाठोपाठ खेडेगावातील सुद्धा आहेत.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा नीट परीक्षेचे केंद्र असून हे सध्या पुराने वेढलेले आहेत. त्यांना जुळणारे रस्ते हे पुराच्या पाण्याखाली आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण ठप्प आहे. सदर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहोचणे मोठे अवघड झालेले आहे. आणि पोहोचायचे झाल्यास एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हवाई मार्ग.
संपूर्ण पूर परिस्थितीचा, हवामान खात्याच्या दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार शासनाने 17 जुलै 22 रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विद्यार्थी आणि पालकांची कळकळीची विनंती आहे.