वाशिम : गेल्या पंचवीस वर्षात एकवेळा विधानपरिषदेचे आणि तिन वेळा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे, लोकप्रिय आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी पाटणी यांना राज्यमंत्री मंडळात समाविष्ट करून गेल्या जवळ जवळ विस ते बाविस वर्षापासून, मंत्रीमंडळापासून वंचित असलेल्या वाशिम जिल्हयाचा, नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना. एकनाथजी खडसे यांनी मंत्रिमंडळात समावेश करून, आ राजेंद्रजी पाटणी यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करावी अशी वाशीम जिल्ह्यातून मागणी होत असल्याचे, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेले कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी हे शांतताप्रिय, संयमी, सामाजिक बांधीलकी असणारे, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर आमदार म्हणून ओळखले जातात. परंतु जोपर्यंत त्यांचेकडे मंत्रीपदाची जबाबदारी मिळणार नाही तो पर्यंत विकासापासून वंचित असलेल्या,मागासलेल्या दुर्लक्षित वाशीम जिल्ह्याची प्रगती होऊ शकणार नाही आणि म्हणूनच नवनिर्वाचित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जिल्हावासियांच्या भावनांचा विचार करून, आगामी मंत्रीमंडळ विस्तारात प्राधान्याने जिल्हयाच्या विकासाचे दृष्टिने,कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्रजी पाटणी यांचा मंत्री मंडळात समावेश करावा अशी मागणी होत आहे.