कारंजा (लाड) :-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालीत श्री.गुरुदेव सेवा मंडळ,श्री.गुरुदेव महिला व पुरुष भजनी मंडळ कारंजा (लाड) तालुक्याच्या वतीने,गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका गुरुकुंज ते पंढरपूर प्रचार यात्रेच्या निमित्त्याने,श्री.गुरुदेव सेवा मंडळ परिवाराचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे भव्य आयोजन, श्री.गुरुदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांतीनगर कारंजा (लाड) येथे दिनांक १ जुलै २०२५ मंगळवार रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा,कारंजाचे माजी नगराध्यक्ष मा. अरविंद लाठीया, कारंजा (लाड) यांच्या अध्यक्षतेखाली, उद्घाटक माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांचे शुभ हस्ते श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक श्रीकृष्ण पाटील नेमाने, दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सुधिर देशपांडे, दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी विजय काळे, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर व्यवहारे, श्रीकृष्ण पाटील मुंदे डॉ. दिलीप रावजी गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. उल्लेखनिय म्हणजे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकांचे आगमन दि १ जुलै २०२५ रोजी,दुपारी ०४:०० ते ०५ :०० च्या दरम्यान श्री.गुरुदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांतीनगर येथे होणार आहे. याप्रसंगी श्री गुरुदेव आश्रम गुरुकुंज मोझरीचे मध्यवर्ती प्रतिनिधी ह.भ.प.प्रकाश महाराज वाघ, ह.भ. प.सुशील महाराज वनवे प्रचार सचिव प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाविका भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ तसेच महिला पुरुष भजनी मंडळ कारंजा (लाड)तालुक्याच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.असे वृत्त अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळ कारंजा (लाड)जिल्हा वाशिम प्रसिद्धी प्रमुख विजय खंडार यांनी कळविले असल्याचे सेवाश्रमाचे प्रचारक प्रदिप वानखडे यांनी कळवीले.