कारंजा (लाड) सध्या कारंजा नगर पालीकेचा कारभार बेजबाबदार अधिकार्याच्या प्रशासनाकडे असून,पावसापूर्वी करावयाची कामे सध्या मंद अशा कासवगतीने कारंजा शहरात भर पावसाळ्यात सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कारंजा शहरात नाल्यांची साफसफाई दररोज काळजीपूर्वक व्यवस्थित होत नसल्याने पावसाचे पाणी जर आले तर कचर्याने तुडूंब नाल्याऐवजी रस्त्याने वहात जाऊन, कारंजातील प्रमुख मार्गावरून व प्रत्येक चौकामधून नदी नाल्याप्रमाणे रौद्र रूप धरून वहात असते तसेच सध्या बसस्थानक ते डॉ आंबेडकर चौकातून सिमेंट रस्त्याचे बांधकाम अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. मात्र हे रस्ताचे बांधकाम करण्यापूर्वी येथील, साडपाण्याचे नाल्याचे बांधकाम करणे आवश्यक असतांना त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य करण्यात आल्याने,मंगळवारी दि ४ जुलैच्या सायंकाळी आलेल्या धुवाँधार पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या गोरगरीब नागरीकांच्या घराघरात आणि दुकानात शिरल्याने, नागरीकाकडून कारंजा नगर पालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढल्या जात आहेत.तरी कारंजा नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक व महसूल विभागाचे तहसिलदार यांनी संबधीत रस्त्याचे निरीक्षण करण्याची मागणी होत असल्याचे वृत्त संजय कडोळे यांनी कळविले आहे .