कारंजा (लाड) : अखेर अखील भारतिय मराठी नाट्य परिषदेची नविन कार्यकारिणी करीता बहुचर्चीत,पंचवार्षिक कार्यकारिणी निवड,सांमजस्यात पार पडल्यामुळे नाट्य कलावंता मध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, नविन कार्यकारिणी निवडीकरीता सार्वत्रिक निवडणूक न घेताच, नुकतीच स्थानिक नाट्य कलावंताची आमसभा पार पडली.ज्यामध्ये गटातटाचे राजकारण गोडी गुलाबीने संपुष्टात आणून,सर्वानुमते कार्यकारीणीची निवड करण्यात आली.त्यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रमोद जिरापूरे यांची तर नाट्य परिषदे मधील अत्यंत महत्वाचे असणारे प्रमुख कार्यवाह या पदावर माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष (प्रशासन) - श्रीकांत भाके ; उपाध्यक्ष (उपक्रम) -नंदकिशोर कव्हळकर ; कोषाध्यक्ष - शशिकांत नांदगावकर ; सहकार्यवाह - अश्विन जगताप,अक्षय लोटे, प्रणिता दसरे ; सदस्य - शकिल शेख,भारत हांडगे,अतुल धाकतोड,अजय मोटघरे,अंकित जवळेकर,श्रद्धा रगडे,राजीव कंटाळे,वैभव खेडकर,दिनेश कडोळे,रोहित महाजन,विजय श्यामसुंदर यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे वृत्त आहे.मात्र एवढे राजकारण होऊनही केवळ कार्यकारिणीतील पदाकरीता खेळी झालेली असून,कारंजा नगरीतील तळागाळातील नाट्य कलावंताच्या समस्या,अडचणी आणि सांस्कृतिक नाट्य सभागृहाचा प्रश्न मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही गेल्या सत्त्याहत्तर वर्षापासून अधांतरीच राहील्यामुळे हाडाच्या नाट्यकलावंता मधून नाराजीचा सूर स्पष्टपणे उमटत आहे.