कारंजा : महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्ताने दि.६/१२/२०२४ रोजी,कारंजा येथून जवळच असलेल्या इंझा (वनश्री) ग्रामपंचायत मध्ये भावपूर्ण आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गट ग्रामपंचायत इंझा येथील सरपंच सौं. राधिकाताई संकेत नाखले तर प्रमुख पाहुणे म्हणून गट ग्रामपंचायत इंझा अनई येथील सचिव एम. ए. काकड मॅडम, इंझा येथील अंगणवाडी शिक्षिका सौं. लताताई ढेंबरे हे होत्या सर्वप्रथम मान्यवरांनी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना हार अर्पण केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर उपस्थित मान्यवरांनी भाषण केले व डॉ. बाबासाहेबांना दोन मिनिटे मौन्य राहून आदरांजली देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत कर्मचारी गणेश बागडे तर आभार प्रदर्शन सोपान खडसे यांनी मानले.या आदरांजलीच्या कार्यक्रमाला सर्व सदस्य गण व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते