कारंजा : पृथ्वीवरील पर्यावरणाला अनन्य साधारण असे महत्व आहे. आणि पर्यावरणातील प्राणवायूला दुसरा पर्यायच असू शकत नाही त्यामुळे केवळ झाडे लावून-झाडे जगवूनच नैसर्गिक प्राणवायू आपण मिळवू शकतो. आणि म्हणूनच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी,वर्षा ऋतुचे औचित्य साधून कारंजा येथील एच डी एफ सी बँक अधिकारी कर्मचार्यांकडून,भव्य असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम,बॅकेचे शाखाधिकारी अमित छावछारिया यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येवून,मुर्तिजापूर महामार्गालगत, श्री हनुमान मंदिर जवळ,आई तुळजाभवानी मंगल कार्यालयाजवळ घेण्यात आला. या राष्ट्रीय तथा सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेत शाखाधिकारी अमित छावछरीया, रोहिणी काळबांडे,सौरभ हजारे,विशाल चव्हाण,दिपक वानखडे,लिकेश बांडे,पंकज अहेरवार,उमेश अनासाने,संतोष जाधव यांनी, जिवनोपयोगी वृक्षांची लागवड केली असे वृत्त त्यांचेकडून,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविण्यात आले.