अकोला:- किसन आनंदराव जाधव राहणार दाताळा यांच्या खून प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांनी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुर्तीजापुर ग्रामीण श्री भगत यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून दिनांक 17/03/2024 पासून गुन्हा दाखल केला नसल्यामुळे अकोला पोलिसांचा भ्रष्टाचार बंद होण्यासाठी व न्याय मिळण्यासाठी दिनांक 14 /4 /2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकोला पोलिसांचे भ्रष्टाचाराबाबत फलक लावून उपोषण करण्यास परवानगी मागितली व वडील किसन आनंद जाधव हे गुरे चारण्याचे काम करीत होते. दिनांक 17/03/ 2024 रोजी अक्षय सुनील देशमुख सुनील मुकुटराव देशमुख तसेच त्यांचे चौकीदार देशमुख यांच्या संगणमताने वडील किसन आनंदराव जाधव यांना मारहाण करून जीवे मारले व त्यांचा खून केला. पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे तक्रार दिल्यानंतरही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे झालेल्या शवविच्छेदानामध्ये छातीवरील जखमेमुळे मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले. पोलीस स्टेशन मूर्तीजापुर ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना वारंवार भेटले असता तुम्ही प्रकरण आपसात करा तुम्हाला शासनाकडून व वनविभागाकडून मदत मिळून देतो असे सांगितले. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्री डोंगरे साहेब यांना भेटलो असता व त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापुर यांच्याकडे प्रकरण पाठवले परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला नसल्यामुळे जनतेला त्यांच्यासोबत संपर्क साधता येत नाही त्यामुळे भ्रष्टाचारावर बाबत व तात्काळ माहिती देता येत नाही जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना विनंती केली की किसन आनंद जाधव यांची खून प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची कृपा करावी व भ्रष्टमार्गाचा अवलंबन करणारे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुर्तीजापुर ग्रामीण यांची विरुद्ध कारवाई करण्याची कृपा करावी अन्यथा गरीब व भटके विमुक्त जातीचे कुटुंब असल्यामुळे व अकोला पोलीस विभागात भ्रष्टाचार जास्त झाल्यामुळे न्याय मिळत नसल्याचे समजून दिनांक 14 4 2000 रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला चे समोर शासनाचा निषेध व अकोला पोलीस विभागाचा भ्रष्टाचार याबाबत फलक लावून उपोषण सुरू केले आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा निवडणूक अधिकारी अकोला लोकसभा मतदारसंघ अकोला यांना विनंती केली आहे की आचारसंहिता सुरू असताना अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार विरुद्ध कोणताही पत्रव्यवहार न झाल्याने आपणास परवानगी दिली अशी समजून फलक लावून उपोषण सुरू केले असून त्यामध्ये अकोला पोलीस वाहतूक शाखेतील भ्रष्टाचार अजून तेच लक्झरी स्टॅन्ड देण्याच्या भ्रष्टाचार व सर्व बाबी उघड करीन तसेच मंत्री किती रक्कम मिळाली याची सुद्धा विचारणा करीत आहे करिता गुन्हा दाखल होण्याच्या आधीच तात्काळ देण्यासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलेले आहे मंगेश किसन जाधव आणि सुनील किसन जाधव अशी माहिती सुनील जाधव यांनी दिली.
याप्रकरणी वन अधिकाऱ्यांकडून देखील माहिती घेतली असता कुठल्याही जनावराचा हल्ला मृत व्यक्तीवर झालेला नसल्याचे निष्पन्न होत आहे असे व्ही आर थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या तपासणीत सांगण्यात आले अशा आशयाचे पत्र सुद्धा देण्यात आले आहे.