उष्टे अन्न कुणाला खायला देऊ नये.!उष्टे पाणी कुणाला प्यायला देऊ नये..!आजचे विज्ञान काय सांगते?
पाणी पितांना कधीही पिल्यानंतर उष्टा ग्लास न धुता ठेवू नये, कारण पाणी पितांना ओठावरची लाळ ग्लासला लागते व तोच ग्लास अन्य कुणीही पाणी पिण्यासाठी वापरला तर ग्लासवरील लाळेतील सूक्ष्म जंतू पोटात जातात आणि जर त्या व्यक्तीची प्रतिकार क्षमता कमी असल्यास त्याला त्रास संभवू शकतो. असे आजचे विज्ञान सांगते म्हणून कुणाला उष्टे पाणी देऊ नये किंवा माठातील, गुडांतील पाणी मघ, गडव्याने पाणी काढावे. ग्लास माठात बुडवू नये.
पाणी पिणे ही चांगली सवय आहे. पाण्याला "जीवन" असे म्हटले जाते. आपले शरीर रचनेत ७९% जागा ही पाण्याने व्यापली आहे. पचनक्रिया, अन्नशोषण प्रक्रिया, लाळ निर्मिती जीवनसत्वांना शरीरात पोहचवण्याचे काम पाण्याच्या सहभागातून होत असते. पाण्याने मेंदूतल्या पेशींना चालना मिळते. पाणी शरीराला वंगण म्हणून भूमिका बजावते. मानसिक व शारीरिक क्षमता वाढते. त्वचा तेजस्वी होते. शरीरातील गॕसच्या तक्रारी दूर होतात. अन्न पचन होते. पाणी उकळून पिणे फारच चांगले आहे. दिवसातून ६ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. नेहमी बसून पाणी प्यावे. उन्हातून आल्यावर थंड पाणी पिऊ नये. थकवा आला असता, मानसिक तणाव आला असताना पाणी प्यावे. अतिथंड पाण्याने अंग जड पडते. ही सर्व कारणे विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
उष्टे अन्न कां खाऊ नये.
एका व्यक्तीचं उष्ट दुसऱ्याने खाऊ नये, याचे शास्त्रीय कारण असे आहे की, व्यक्तीच्या हातात जे काही जंतू चिकटलेले असतात. ते जंतू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात शिरुन त्या व्यक्तीला हानीकारक ठरुन पोटाचे विकार होतात. जंत, कृमी पसरवू शकतात. परदेशातील लोक अन्न काट्या चमच्यांनी खातात, ते कधीही हाताने खात नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे हाताला विषाणू असतात. आपण आपल्या देशात हाताने जेवतो. अनेक जंतू एकमेकांच्या उष्टे खाण्यातून जाऊ शकतात. उदा- एक सावत्र आई सावत्र मुलाला सर्वांच्या ताटातील उष्टे अन्न जमा करून त्याचा लाडू करुन जेवायला वाढत असे. बरेचदा उष्ट खाल्ल्यामुळे प्रेम वाढत असते असे म्हणतात पण हे खरे नाही. बरेचदा पतीचे उष्टे पत्नीला खावे लागते. एकच लक्षात ठेवायचे की, कुणाचेही उष्टे खाऊ नये.
बरेचदा अन्नाची नासाडी करेपर्यंत जास्त अन्न ताटात वाढून घेऊ नये. ताटातील अन्न वाया जाऊ देऊ नये. बरेचदा अन्न हाताने न वाढता चमच्याने अन्न वाढावे. जेवण करताना कधीच कुणाला टोकू नये. कुणाशी वादविवाद करु नये. दुसऱ्याचे हिश्याचे अन्न आपण स्वतः कधीही खाऊ नये. दुसऱ्याचे हिश्याचे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दरिद्री येते. उदा- श्रीकृष्ण व सुदामा ऋषीकडे शिक्षण घेत असताना सुदामा आणि कृष्णाला लाकडे जमा करून आणण्याकरिता गुरुमातेने सांगितले. गुरुमातेने सुदामाजवळ फुटाणे एका कपड्यात बांधून दोघांनी खायला दिले. लाकडे गोळा करताना जोराचा पाऊस बरसला. सुदामाने गुरुमातेने दिलेले फुटाणे कृष्णाच्या हिश्याचे पूर्ण खाऊन टाकले. पुढे सुदामाला दरिद्री, गरीबी आली. म्हणून आपल्या भोवतालचे पशुपक्षी, अतिथी, याचक यांना त्यांचा भाग देऊन मगच आपण भोजन ग्रहण करावे.
जेवण करताना मौन पाळावे. मौन पाळणे ही कला आहे. न बोलल्यामुळे मनाची ताकद वाढते. अन्नाचे रक्तात, हाडामध्ये, मनामध्ये रुपांतर होऊन आनंद होतो. टीव्ही पाहताना जेवण करु नये. फिरत फिरत उभ्याने अन्न खाऊ नये. दोन्ही हात लावून चपाती, पोळी तोडू नये. अन्नावर टीका करु नये. कधीही ताटावरुन उठून जाऊ नये.
जैसा खाये अन्न, वैसा बने मन ।
जैसा पिये पानी, वैसी बोले वाणी ।।
जसे आपण अन्न खातो तसे आपले मन बनत जाते. यासाठी काय खावे, काय खावू नये, केव्हा खावे, कुठे खावे, कसे खावे या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. जगण्यासाठी आहाराची आवश्यकता असते. आपण जे खातो, पितो ते आपल्या शरीराच्या पाॕवर हाऊसचे इंधन आहे. जेवायला सुरूवात करायचे आधी एक मिनीट देवाचे नामस्मरण करावे. नंतर जेवण सुरू करावे. त्यामुळे आपली मनस्थिती फार चांगली बनते व राहते. ताट समोर आले की बरेच जण हा श्लोक म्हणतात.
वदनि कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे ।
जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रम्ह ।
उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म ।।
जेवण सुरू करायचे आधी हा श्लोक म्हणण्याची पध्दती आहे. देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद ह्या भावनेने ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्ती व चैतन्य मिळू दे तसेच कुणाचे उष्टे खाल्ल्याने देखील आपल्या मनस्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
शरीरमाद्दं खलु धर्म साधनम् ।।
सर्व प्रकारच्या धर्माला योग्य अशा क्रिया कर्मांना शरीर चांगले असणे आवश्यक आहे. चांगल्या शरीरासाठी छान सकस व शाकाहारी अन्न सेवन करणे आवश्यक ठरते.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....