कारंजा (लाड) : कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या स्वाभिमानासाठी इतिहासात अजरामर होऊन गेलेले एकमेव स्थानिक माजी आमदार,विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास महर्षी लोकनेते स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या जयंती निमित्त,मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी.स्व. प्रकाशदादा डहाके मित्र मंडळ कारंजा कडून त्यांचा भव्य दिव्य असा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून त्या निमित्ताने सर्वप्रथम सकाळी ०९:०० वाजता सभापती निवास कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे प्रतिमा पूजन व हारार्पण आणि अभिवादन सोहळा, सकाळी ०९:३० वाजता ऋषी तलाव येथे वृक्षारोपन, सकाळी १० : ०० वाजता स्व. प्रकाशदादा डहाके वनपर्यटन केन्द्र कारंजा येथे त्यांचे स्मृती निमित्त भव्य वृक्षारोपण सोहळा, दुपारी ०३:०० वाजता स्व. प्रकाशदादा डहाके सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सायंकाळी ०५:०० वाजता स्थानिक श्री गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालय कारंजा आणि वृद्धाश्रम कारंजा येथे अन्नसेवा, सायंकाळी ०६:०० वाजता शक्तिस्थळ दत्त कॉलेनी कारंजा येथे प्रतिमा पूजन व विशाल अभिवादन सोहळा,रात्री ०७:३० वाजता सभापती निवास कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांच्या सुमधूर स्वरात भजनसंध्या आयोजीत करण्यात आली असून, सर्व कार्यक्रम कारंजा नगरीच्या पहिल्या स्थानिक महिला आमदार तथा पहिल्या महिला सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, माजी पंचायत समिती सभापती व सदस्य माजी नगराध्यक्ष व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य,आजी माजी सरपंच, दादांचे सर्वच चाहते दादाप्रेमी आणि महिला मंडळी,पत्रकार यांची उपस्थिती राहील. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्व. प्रकाशदादा डहाके मित्र मंडळ कारंजा कडून करण्यात आल्याचे वृत्त मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.