वाशिम : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेच्या लाभार्थ्यां कडून,दर सहा महिन्यानंतर "हयात असल्याचे (जीवन) प्रमाणपत्र, आधारकार्ड,पॅनकार्ड,बँक पासबुक झेरॉक्स,मोबाईल नंबर" इत्यादी माहिती घेण्यात येते.व लाभार्थी कलाकार संबंधीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे आवक जावक विभागाद्वारे "हयात प्रमाणपत्र' नियमीत पणे सादर करतात. तेव्हा संबधित विभागांनी आपल्या रजिस्टरला लाभार्थी कलावंताची नोंद ठेवून, लाभार्थ्याचे हयात प्रमाणपत्र अचुक वेळेवर तात्काळ सांस्कृतिक कार्य संचालनालयाला पोहचविणे अत्यावश्यक आहे. लाभार्थी कलावंत हयात प्रमाणपत्र वेळेवर सादर करतात. परंतु असे असतांना,सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून गरजू लाभार्थी जीवंत असतांना त्यांची नावे त्रुटीच्या यादीमध्ये कशी काय टाकली जातात? आणि सरसकट लाभार्थ्यांची यादी कोठे बघायला मिळणार ? असा प्रश्न लाभार्थी वृद्ध साहित्यिक कलाकारांना पडला आहे ?