अकोट तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाणारे केंद्र म्हणजे मुडगांव प्राथमिक आरोग्य केंद्र होय या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच मुख्यालयात हजर राहत नाहीत तर कर्मचारी कसे हजर राहतील असा प्रश्न उपस्थित होते आज अचानक सकाळी ११वाजताचे दरम्यान जिल्हा परिषद चे सभापती पंजाबराव वडाळ यांनी अचानक भेट दिली असता अनेक कर्मचाऱ्यांनी दांड्या मारल्या असल्याचे सभापती पंजाबराव वडाळ यांच्या लक्षात आले.तेव्हाअशा दांड्या देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर सभापती पंजाबराव वडाळ कोणती कारवाई करतात या कडे तालुक्यातील जनतेने लक्ष लागले आहे.या आरोग्य केंद्राच्या बाबतीत अनेक वेळा वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु वैद्यकीय अधिकारी व तालुका अधिकारी यांचे संगणमत असल्याने या आरोग्य केंद्राला वरीष्ठानी वाऱ्यावर सोडले आहे व याला साथ जिल्हा आरोग्य अधिकारी देत असल्याने असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत तेव्हा या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व आरोग्य सभापती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या आरोग्य केंद्रा कडे लक्ष वेधून कारवाई ची मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.तसेच या आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांनी अघाप पर्यंत साधी भेट सुद्धा दिली नाही.जिल्हा आरोग्य अधिकारी उंटावरून शेळ्या हाकलण्याचे काम करत असल्याचे सुजाण नागरिकाचे म्हणणे आहे.तसेच मध्यंतरी अकोट पंचायत समिती चे गटविकास अधिकारी शिंदे यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री 9 वाजता चे सुमारास अचानक भेट दिली होती परंतु वैद्यकीय अधिकारी व बरेच कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याने गटविकास अधिकारी शिंदे यांच्या लक्षात आले परंतु नंतर या प्रकरणी गटविकास अधिकारी शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे पुन्हा आज दिनांक ३सप्टेबर रोजी तशीच परिस्थिती आज सकाळी सभापती पंजाबराव वडाळ यांना पाहण्यास मिळाली तेव्हा आता या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर कोणती कारवाई करण्यात येणार या कडे तालुक्यातील जनतेने लक्ष लागले आहे.त्याच प्रमाणे या आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक गांवडे हा तर आठवड्यातुन एकदाच आरोग्य केंद्राच्या कार्यालयात उपस्थित असतो इतर दिवशी हे महाशय सापडतच नाही तेव्हा वरीष्ठानी या आरोग्य केंद्राकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज सकाळी ११वाजता मुडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक भेट दिली असता मला अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात हजर राहत नाहीत व त्यानी दांड्या मारल्या व कोणत्याही प्रकारचे सुट्टीचे अर्ज नव्हते तेव्हा अशा दांड्या मारणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल....
पंजाबराव वडाळ सभापती जिल्हा परिषद अकोला.
नेहमीच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात उपस्थित नसतात तसेच दांड्या सुद्धा नेहमी मारतात व गटविकास अधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा पासून मोठ्या प्रमाणात दांड्या मारण्याचे प्रमाण वाढले आहे.तसेच अनेक वेळा सुट्टी न टाकता अधिकारी व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रातुन गायब असतात....
अजिज अहमद,
सामाजिक कार्यकर्ता मुंडगाव
वैद्यकीय अधिकारी हेच तर मुख्यालयात हजर राहत नाही तर मग कर्मचारी कसे राहतील त्या मुळे कर्मचारी दांड्या मारण्यात तरबेज झाले आहेत.तसेच गटविकास अधिकारी शिंदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसांपूर्वी रात्री 9 चे दरम्यान भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीच गायब होते परंतु त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
राजकुमार वानखडे महिला मुक्ती मोर्चा अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख