वाशिम - जिल्ह्यात डी.ए.पी. खतासोबत नॅनो व सल्फर खताची लिंकिंग करून कृषी सेवा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.ही फसवणूक थांबवा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर विशाल सोमटकर यांनी निवेदनाद्वारे दिला.
या संदर्भातील निवेदनानुसार, खरीप हंगाम २०२५ साठी जिल्हयातील शेतकरी बांधवं बी-बियाणे व रासायनिक खताच्या खरेदीसाठी खत विक्रेत्यांकडे जात आहे.वाशीम जिल्हयातील शेतकयांची डी.ए.पी खताला प्रथम पसंती असल्यामुळे शेतकऱ्याची गरज लक्षात घेवून वाशीम जिल्हयातील खतविक्रेत्यांनी गरजू शेतकऱ्याना डी.ए.पी. खत पाहीजे असेल तर तुम्हाला सल्फर खत किंवा नॅनो खत घ्यावेच लागेल.अशी जबरदस्ती सुरु केल्याची माहिती गरजू शेतकऱ्यांकडून प्राप्त आली आहे.आधिच नैसर्गिक व आर्थिक संकटांचा सामना करत जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलला आहे.वाशीम जिल्हयातील सर्व गरजू शेतकऱ्याऱ्यांना खरीप हंगाम २०२५ साठी आवश्यक असलेल्या डी ए.पी खताचा साठा आपण शासनाकडून प्राप्त करुन द्यावा.तसेच कोणत्याही खत कंपनीने लिंकींगची जबरदस्ती करु नये.यासाठी सुध्दा आपण उपाययोजना करण्याची मागणी शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी शिवसेनेचे शाम खरात,आकाश कांबळे, जावेद परवेज,राजु पुणेवर, अब्दुल आकीब,गोपाल सोमटकर,गोपाल बोरकर,मदन भडके,गोपाल सारस्कर,संतोष इंगोले,संदीप कांबळे,अनिल भडके,सुरिंदरसिंग सेठी यांच्यासह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थीत होते.असे वृत्त डॉ.विशाल सोमटकर यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना पाठवीलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळवीले आहे.