आरमोरी - जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पुर येऊन आताच महागडे बियाणे घेऊन पिकाची रोवणी केलेली शेतकऱ्यांचे धान पिके वाहून गेल्याने बहुतेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली असताना पहीलेच रोवणीच्या वेळी शेतकऱ्यांनी उसने उदार करुण लावलेले पेसे ही वाया गेल्याने शेतकरी आथिर्क अडचणीत सापडला आहे तसेच सततच्या पावसामुळे नागरीकाचे राहते घरे पुणता पडुण जमीन जोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असल्यामुळे प्रशासनाने तातडीने आरमोरी देसाईगंज कुरखेडा कोरची धानोरा सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व घराची पडघम झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी दिले आहे.