वाशिम - अपराजीत खासदार तथा विधान परिषदर आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या ब्रिदवाक्यानुसार युवा सेना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे यांच्या नेतृत्वात शुक्रवार, २३ मे रोजी शहरात दुग्धाभिषेक सोहळा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, शालेय गणवेश वाटप व अंध मुलांना स्नेहभोजन आदी सामाजीक उपक्रम राबविण्यात आले. या विविध उपक्रमामध्ये शिवसेना आणि युवासेनेच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिकांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रारंभी सकाळी ७ वाजता वत्सगुल्म नगरीचे आराध्य दैवत श्री बालासाहेब सरकार यांच्या मुर्तीला भक्तीभावाने दुग्धाभिषेेक करण्यात आला व व आ. गवळी यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजता खोडे माऊली नगर येथील दोन गरीब कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाचा भार रवि भांदुर्गे यांनी उचलून त्यांना १ वर्षाचा शालेय शैक्षणिक खर्च देण्यात आला. तसेच शहरातील विविध ठिकाणी जिल्हाध्यक्ष रवि भांदुर्गे यांच्या हस्ते विविध वृक्षांचे रोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यामध्ये विविध जातीच्या बहूउपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. यासोबतच सिव्हील लाईन येथील नगर परिषद शाळेतील मुला मुलींना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या सामाजीक उपक्रमाचा एक भाग म्हणून केकतउमरा येथील चेतन सेवांकुरच्या अंध व मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाला आतिश भांदुर्गे, सौ. किर्ती भांदुर्गे, युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, चंद्रभागा सातव, वैभवी भांदुर्गे, गिरीराज भांदुर्गे, दुर्वा भांदुर्गे, ज्ञानेश्वर गोरे, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब देशमुख, युवासेना शहर सचिव रोहीत वनजाणी, श्रीजीत गंगावणे, शुभम घुगे, शिवम घुगे, रवि इंगोले, रामा जोगदंड, दिपकराव देशमुख, रवि खोटे, पुजा इंगोले, कोमल खोटे, विजय रामवाणी, मुकेश रत्नाणी, युवासेना उपतालुकाप्रमुख महिंद्रा डाखोरे, संतोष ढोले, शाखाप्रमुख सुमित ठोंबे यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवतीसेना, सर्व आजी माजी पदधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिकांची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....