अकोल्याचे आराध्य दैवत राज राजेश्वर महाराज यांना प्रशांत दादा कदम यांच्या हस्ते दुग्ध भिषेक करून महाआरती
अकोला - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा कदम यांचे आज राज राजेश्वर नगरी मध्ये प्रथम आगमन प्रित्यर्थ त्यांचे अकोल्याचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिर येथे शाल श्रीफळ देऊन त्यांचा अनिल मालगे महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग अकोला यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी प्रशांत दादा कदम यांनी राजेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेऊन दुग्ध भिषेक व महाआरती केली.
व अकोल्याचे आराध्य दैवत राजेश्वर महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वरून राजाची कृपा राहो व बळीराजा सुखी होवो यासाठी प्रार्थना केली यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला महानगरपालिकेचे गटनेते मनोज गायकवाड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महानगर अध्यक्ष वैभव घुगे महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस गणेश शिंदे आदित्य मालगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती अनिल मालगे महानगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग अकोला यांनी दिली