वाशिम : जिल्हयात मागील काही दिवसात काही भागात अल्पसा पाऊस झाला असल्याने शेतक-यांनी या
पावसाच्या भरवशावर पेरणीची घाई करु नये. मान्सुनचे जिल्हयात अद्यापही आगमन झाले नसुन पडलेला पाऊस
हा वळवाचा आहे त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करु नये. मान्सुनचे आगमन झाल्यानंतर ७५ ते १०० मी.मी.
पाऊस किंवा जमीनीत ६ इंच खोल ओल गेल्यानंतरच पेरणी करावी. अल्पशा ओलाव्यावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई न करता जमीनीत चांगली ओल
झाल्यानंतरच बियाण्यास बिजप्रक्रिया करुनच पेरणी करावी. जिल्हयात सोयाबीन हे मुख्य पिक असुन याकरीता
रासायनिक किटकनाशक थायोमिथोक्झाम ३० टक्के ८ मी.ली. किलो बियाण्यास लावावे व त्यांनतर
रायझोबियम, पी.एस.बी. व के. एम. बी. २५ ग्रॅम किलो बियाण्यास लावुन पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ