आयुष्यातल्या महत्वाच्या दिवसांपैकी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे
शिक्षक दिन कार्यक्रमाच्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून स्थान भूषविलेल्या व्यासपीठावरून महेश कोलावार यांचे गौरव्दोगार
चंद्रपूर :-
राजे धर्मराव महाविद्यालय सिरोंचाने केलेला सत्कार म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा सत्कार आहे असे प्रतिपादन त्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश कोलावार यांनी केले आहे.
शिक्षकदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून राजे धर्मराव महाविद्यालयाने महेश कोलावार यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावून त्यांचा हात रुमाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी व्यासपीठावरून आपले मनोगत व्यक्त करतांना महेश कोलावार म्हणाले की आयुष्यात आपण जिथे - जिथे प्रवास करतो त्या - त्या प्रवासानुसार आपल्या वाट्याला अनेक सुखद क्षण येतात.त्यापैकीच एक सुखद क्षण म्हणजे आजचा हा सुंदर सोहळा.
सन २०१० मध्ये १० व्या वर्गात शिकत असतांना शिक्षक दिनाच्यादिवशी मी एकदिवसीय मुख्याध्यापकाची भूमिका पार पाडली होती.आजही तो दिवस व तो कार्यक्रम माझ्या डोळ्यासमोर जिवंत उदाहरणासारखं उभा आहे.वर्ग ८ वा "ब "म्हणजे तेव्हाचे शिक्षक पद्माकर वाढई यांच्या वर्गात सदर कार्यक्रम त्याकाळी आपण आयोजित केला होता.प्राचार्य संजय बन्सोड,उपप्राचार्य व्येंकटसुब्बाराव चिंतलापुडी व पूर्व पर्यवेक्षक कुंभारे आणि समस्त शिक्षकवृंद,कर्मचारी हे आमचे तेव्हाचे शाळेतील पालकवर्ग होते.
मला आजही प्राचार्य संजय बन्सोड यांचे भाषण आठवते. त्यांच्या मनोगतात बोलतांना मला गमतीने म्हणाले की धन्यवाद महेश कोलावार,मी सुट्टीवर असतांना आपण माझ्या भूमिकेत एकदिवसीय मुख्याध्यापक म्हणून माझी जबाबदारी स्वीकारून पार पाडली. हे शब्द आजही माझ्या हृदयात साठवून ठेवून आहे.त्या कार्यक्रमात महाविद्यालयानी आम्हाला एक "पेन"सप्रेम भेट म्हणून दिली होती,जी पेन आजही माझ्या चंद्रपूरच्या कार्यालय खोलीतल्या वस्तुसंग्रहालयात सांभाळून आहे.
फक्त खंत व दु:ख एकाच गोष्टीची आहे की कुठल्यातरी एका शिक्षकांनी एखाद्या छायाचित्रकाराला बोलावून आमचा म्हणजेच जे मुलं आम्ही मुख्याध्यापक,उपमुख्याधपक, पर्यवेक्षक बनलो होतो,त्या भूमिकेतील एक आठवणीचा क्षण म्हणून एखादातरी छायाचित्र काढायला हवा होता.पण ते अनावधाने माझ्याकडून राहून गेले.
याचे कारण असे आहे की कार्यक्रम संपल्यावर आम्ही मित्र म्हणजेच मुख्याध्यापक, उपमुख्याधपक,पर्यवेक्षक या भूमिकेतील मुलांनी मिळून सर्व शिक्षक व कर्मचा-यांसाठी चहा-बिस्कीटची व्यवस्था केली होती. मी त्या व्यवस्थेच्या गडबडीत सदर क्षणचित्र मला कैद करता आले नाही.याचे दु:ख मात्र मला नेहमीच वाटते.परंतु शाळेनी सप्रेम भेट म्हणून दिलेली पेन मात्र माझ्याकडे अजूनही आहे व नेहमी राहणार यातच मी समाधान मानत असतो.
त्याकाळी आम्ही शिकत असतांना महाविद्यालयात जवळपास ५० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि १८०० विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत होते.आज त्यातले अर्ध्यापेक्षाही अर्धे शिक्षक, कर्मचारी व अर्धे विद्यार्थी या शाळेत नाहीत.उदा.काही निवृत्त झालेत व काही जण देवाघरी निघून गेलेत. यावेळी मी कुणा-कुणाचे नाव घेऊ.सर्वच माझे जवळचे व सर्वच माझ्यावर प्रेम करणारे शिक्षक होते.माहित नाही आता ५ सप्टेंबर २०१० चा हा प्रसंग कुणा-कुणाला आठवतो तर.आज या गोष्टीला १४ वर्ष पूर्ण होत आहे.
परत आज १४ वर्षानंतर शिक्षक दिनाच्यादिवशी मला राजे धर्मराव महाविद्यालयांनी माजी विद्यार्थी या नात्याने प्रमुख अतिथी म्हणून बोलावून माझे मनोगत व्यक्त करायला सांगून माझा सत्कार केला आणि सोबतच २ कविताही सादर करायला लावल्या हा दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस आहे.
याचे कारण म्हणजे मी आजवरी अनेक ठिकाणी फिरलो,अतिथी म्हणून गेलो,अनेक सत्कार झाले व सोबतच ५ पुरस्कारही मला मिळाले.पण त्या सर्व सन्मान आणि पुरस्कारापेक्षाही मला माझ्या शाळेनी तब्बल १४ वर्षानंतर अतिथी म्हणून बोलावून माझा जो सत्कार केला,हा सत्कार,अतिथीचा स्थान आणि मान माझ्या आयुष्याच्या प्रवासातील अत्यंत आनंद देणारा क्षणाचा आहे असे मी मानतो.
कारण की ज्या महाविद्यालयांनी मला संस्कार दिलेत,नेतृत्व करायला दिले व मोठं करण्यात स्वत:चे योगदान दिले.आज त्याच शाळेनी माझा गौरव केला हा आनंद माझ्यासाठी गगनात मावेनासा आहे.सोबतच या शाळेतील अनोळखी शिक्षक व विद्यार्थ्यांचा प्रेमही मला भरभरून मिळाला यापेक्षा आज दुसरा आनंद काय पाहिजे आजच्या दिवशीतरी.हे प्रेम व हा आनंद मी कायमस्वरूपी माझ्या मनात घर करून ठेवणार आहे येवढं मात्र नक्की.
तर हा सुखदानंद मला देण्यासाठी प्रयत्न केलेले प्राचार्य गणेश तगरे,पर्यवेक्षक श्रीधराचारी मामीडालवार, शिक्षक विश्वेश्वराव कासर्लावार, लक्ष्मीव्येंकटरमण कोम्मेरा, श्यामराव लेंडे,आरवेल्ली,संतोष जुनघरे,किशोर सिडाम, गंगाधर बल्सीपल्ली,दादाजी हेपट,कोटेश मादरबोईना,अरुण नरेडला, हिरामण तागडे,प्यारेलाल उमरे, सुशांत नन्नावरे,माधव वेनमपल्ली,साईकिरण पद्मगिरीवार,नेहा रच्चावार, शिक्षकेत्तर कर्मचारी
अनुष्का नगराळे,स्नेहा कुंभारे, अशोक पेराला,मोहन गुंडा, सुशिला नागूला,ललिता रंगुवार तसेच चुकीने ज्यांचे नाव सुटले असेल त्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचा-यांचे मी याप्रसंगी मनस्वी आभार मानतो अशी भावना महेश कोलावार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....