वाशिम : प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सन 2014 च्या सार्वत्रीक निवडणूकीच्या विजयानंतर लगेचच, "प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेची"घोषणा केलेली होती.त्यानुसार बेघर आणि निराधार दिव्यांगाचा सर्व्हे सुद्धा करण्यात आलेला होता. परंतु आता जवळ जवळ नऊ वर्षे उलटूनही गरजू बेघराकरीता जिल्ह्यातील एकाही नगर पंचायतने किंवा नगर पालिकेने पाऊले उचलली नाहीत आणि एकाही खासदार किंवा आमदार लोकप्रतिनिधीने अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांगाप्रती आपले कर्तव्य पार पाडले नसल्यामुळे,जिल्ह्यातील गरजू, बेघर,निराधार दिव्यांग प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेच्या लाभापासून वंचित राहीले आहेत. तरी आता सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी शासन दखल घेईल काय ? असा सवाल दिव्यांग बांधवानी उपस्थित केला आहे.