नवरात्र उत्सवा निमित्त भारत राष्ट्र समिती अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नवरात्ररंभा पासून नऊ दिवस गावामध्ये " तेलंगणा मॉडल"सभा ,बैठका घेऊन गावागावापर्यंत पोहोचवणार आहे .त्यासाठी दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून तर 24 ऑक्टोबर 2023 विजयादशमी पर्यंत नऊ दिवस हा जागर चालणार आहे. या जागर च्या माध्यमातून गावागावात " मतदार जनजागृती अभियान" राबवून मतदारांना जागृत करण्यात येणार आहे .त्या माध्यमातून गावागावात भारत राष्ट्र समितीने तेलंगणा राज्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, युवक ,बेरोजगार, महिला, व्यापारी यांच्यासाठी ज्या विविध योजना राबबित आहेत.
त्या सर्व योजना तसेच पक्षाचे ध्येय ,धोरण ग्राम सभेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच "गाव तिथे ग्राम शाखा"स्थापन करण्यात येणार आहेत. भारत राष्ट्र समिती अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक गजानन हरणे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये रोज संध्याकाळी ७ वाजता एका गावाला बैठक ,सभेच्या माध्यमातून हा जागर नवरात्रीनिमित्त गावागावात होणार आहे .त्यामध्ये दिनांक 16 ऑक्टोबरला डाबकी, दिनांक 17 ला म्हैसपूर, दिनांक 18 ला कावसा, दिनांक 19 ला गिरजापुर, दिनांक 20 ला रोणखेड, दिनांक 21 ला कापशी तलाव, दिनांक 22 ला पारळा, दिनांक 23 ला तरोडा, दिनांक 24 ला अनकवाडी या ठिकाणी सभा घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम नवरात्र निमित्त केले जाणार आहे. तरी या जनजागरण नवरात्र महोत्सवामध्ये गावा गावाच्या व परिसरातील जागृत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारत राष्ट्र समिती अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ चे समन्वयक गजानन हरणे.