वाशिम:- सध्या अखिल भारतिय नाट्य परिषद मुंबईच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या, नियामक मंडळाची निवडणूक सुरु आहे.वाशिम जिल्हा निर्मिती झाली तेव्हा पासून, वाशिम जिल्हा नाट्यकलेच्या विकासा पासून सदैवच उपेक्षित राहीलेला आहे. जिल्ह्यात नाट्यकलेला प्रोत्साहन देणारे,नाट्यप्रयोग घडवून आणणारे,नाट्यकलाकारांचे हित जोपासणारे आणि जिल्ह्यात नाट्यसभागृहाची निर्मिती करणारे नेतृत्वच जिल्ह्याला मिळालेले नाही.तसेच मागील सन २०१८ नंतरच्या पंचवार्षिक काळात आधी लोकसभा विधानसभा निवडणूका व नंतर लगेच आलेल्या कोव्हिड१९ च्या जागतिक कोरोना महामारीमुळे नाट्यमंडळाला जिल्ह्यात कार्यच करता आलेले नाही.त्यामुळे जिल्ह्यात खर्याखुऱ्या नाट्यकलावंताची वेळोवेळी उपेक्षाच होत गेली.शिवाय नाटकाचे शौकिन रसिक श्रोत्यांना सुद्धा मनोरंजनाची मेजवानी मिळाली नाही हे कटूसत्यच म्हणावे लागेल. परंतु आता ह्या अडचणी मागे पडलेल्या असून, येणारा काळ नाट्यकलावंताकरिता सुवर्णाक्षरात लिहीण्या सारखा येऊ पहात आहे. सध्या वाशिम जिल्ह्यात अखिल भारतिय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणूका पार पडत आहेत . तेव्हा त्याकरीता,अखिल भारतिय नाट्य परिषदेच्या सर्वच आजिवन सदस्यांनी डोळे उघडून आणि सतर्क राहून मतदान करणे जरूरी आहे.नाट्य कलावंताचे,सोबतच नाट्य रसिकश्रोत्यांचे हित जोपासणारे,कायमच तळागाळातील-सर्व सामान्यांचे-बहुजनांचे हित जोपासणारे,बहुजन समाजातील विश्वासू,मनमिळाऊ,प्रामाणिक व जिद्दीने,शासनाशी संघर्ष करून जिल्ह्यातील नाट्य चळवळ जीवंत ठेवून चळवळीचा विकास करणारे खरेखुरे नाट्य कलावंत परिषदेवर निवडून येणे जरूरीचे आहे.आणि त्याकरीताच जिल्ह्यातील नाट्यकलावंताचा केव्हाही हिरमोड न होऊ देणारे, नाट्यकलावंताचे आशास्थान असलेले,निवडणूकीच्या मतदान पत्रिकेवरील प्रथम क्रमांकाचे उमेद्वार नंदकिशोर अंबादास कव्हळकर व चौथ्या क्रमांकाचे उमेद्वार उज्वल दत्तात्रय देशमुख यांनाच आपण आपले अमूल्य असलेले प्रामाणिक मत देऊन त्यांना निवडून आणावे असे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे पत्रकार यांनी जाहिर पाठींबा देतांना म्हटले आहे.आपल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले की, नंदकिशोर अंबादास कव्हळकर आणि उज्वल दत्तात्रय देशमुख हे हाडाचे कलावंत असून,सर्व राजकिय पक्षांशी व सत्ताधारी पक्षांशी त्यांचे जवळचे संबध आहेत.त्यामुळे निश्चितच ते वाशिम जिल्ह्यातील नाट्यकला क्षेत्राशी कोणतीही बेईमानी न करता व विश्वासघात न करता सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहतील.जिल्ह्यातील नाट्यकलावंताकरीता शासनाकडून जास्तीत जास्त निधी प्राप्त करून, नाटयकलावंताच्या हिताकरीता नाट्य चळवळ यशस्वीपणे चालवतील व जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात नाट्यगृहाच्या इमारती उभ्या करतील असा सुद्धा माझा ठाम विश्वास असल्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी म्हटले आहे.