नागभिड पंचायत समितीतील जि.प.उच्च प्राथ. शाळा बोंड येथे दि.२६ एप्रिल २०२५ ला वर्ग आठवी निरोप समारंभ, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.मंगला अनमुलवार ह्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ, कार्यानुभव साहित्य प्रदर्शनी, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, माता पिता सौजन्य सोहळा, आठवीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले विद्यार्थी बचत बँक धनादेश वितरण , विविध उपक्रम स्पर्धा प्रमाणपत्र वाटप अशा विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख अतिथीचे, सत्कारमूर्तीचे स्वागत शालेय मंत्रिमंडळातर्फे करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. राजकुमार एकवनकर सरांनी प्रास्ताविक केल्यानंतर सत्कारमूर्ती मा.अनमुलवार मॅडम व मा.अनमुलवार सरांचा शाल, श्रीफळ , मानचिन्ह, भेटवस्तू व पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आला. निरोपाच्या ह्या क्षणाला मॅडमना गहिवरून आले. नंतर माता -पिता सौजन्य सोहळा तथा आठवी विद्यार्थी निरोप समारंभ... यावेळी मुलांनी आईं वडिलांवर पुष्पवर्षाव करून पेढा भरविला व त्यांचे आशीर्वाद घेतले त्या प्रसंगाने सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मुलांनी शाळेप्रती, गुरूप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
थोडावेळ नीरव शांतता आणि नंतर प्रमुख मार्गदर्शकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा प्रमाणपत्र वाटप,मानव विकास अंतर्गत इयत्ता आठवीच्या 9 विद्यार्थिना सायकल वाटप व सावित्रीबाई बचत बँक विद्यार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.मा.अजितकुमार बनकर, पोलीस उपनिरीक्षक ह्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करतांना स्पर्धा परीक्षेतील यशाची पायाभरणी प्राथमिक शिक्षणापासून होते. अभ्यासात सातत्य, अवांतर वाचन त्यासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले. मा. ॲड. आनंद घुटके सर, प्रथितयश वकील यांनी विविध स्पर्धा परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शक महोदयांनी शाळेच्या वाचनालयाला आर्थिक स्वरूपात भेट देऊन गावातील एमपीएससी परीक्षा माजी उत्तीर्ण विद्यार्थिनीचे कौतुक करीत असे आदर्श गावातून घडायला हवेत म्हणून सांगितलें. मा. जगदीश राऊत ह्यांनी मनोगतातून शाळेचा, विदयार्थी, गुरूंचा गुणगौरव केला. उपस्थितांनी कार्यानुभव साहित्य प्रदर्शनी बघितली.
कार्यक्रमाला मा.सुरेश अनमुलवार सर,चंद्रकांत दाडगे सर, पुंडलिक तुपट सर, नितेश नवघडे सर, विजय बनकर सर, दिपक उईके सर, दुर्वेकांत बनकर सर,लिना भुसारी मॅडम, अरविंद गोहणे शा.व्य.स.अध्यक्ष मोहिनी मोरांडे उपाध्यक्ष तथा शा.व्य.स.सदस्य, स्वप्नपूर्ती युवा मंडळ, गावकरी, युवक, युवती ह्यांनी उपस्थीत राहून सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचलन आठवीची विद्यार्थिनी निशा मेश्राम हिने तर आभार प्रदर्शन लीना भुसारी हयांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....