मागील दोन दिवसात आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोठा, ठाणेगाव, रामपूर, सालमारा, चामोर्शी, वैरागड, शंकरनगर व इतर गावांमध्ये जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाच्या हातात आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांची छत उडाल्याने नुकसान झाले आहे, त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मुख्यमंत्री यांना निवेदनात म्हटले आहे.