नागभिड --प्रचलित प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांना शेतीचा सातबारा, नमुना आठ मिळण्यासाठी शासन आदेशानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया व्हर्जन 2 मध्ये शेतकऱ्यांनी मोबाईल वरून भरलेली माहिती ई-पीक पाहणी ॲपवर अपलोड होते. मात्र, सदर माहिती तलाठी यांचेकडे पोहचत नसल्या कारणास्तव ई - पीक पाहणी अभावी तलाठ्याकडून शेतकऱ्याला सातबारा सन--2022--23मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कुचंबना होत असुन लंलंईकडे--तिकडे भटकत आहे. परिणामी, तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी बांधवांना सातबारा व नमुना आठ उतारा न मिळाल्यामुळे हे शेतकरी बांधव आधारभूत धान खरेदी नोंदणी करण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने ई - पीक पाहणी ॲप मधील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतीचा सातबारा व नमुना आठ उतारा उपलब्ध करून देण्यात यावे,या बाबत नागभिड येथील शेतकरी ,पञकार संघाचे सचिव तथा दैनिक सुपर भारत मिडीया न्यूज चैनल पुठाकार, वार्ता,ए ,भी,के, न्यूज लाईव्ह तालुका प्रतिनिधी श्री, अरुण रामुजी भोले यांनी दिनांक 10/10/2022रोजी
संमधित तहसील कार्यालय नाग भिड, चंद्रपुर जिल्हाचे पालकमंञी मा,सुधिर भाऊ मुनगंटीवार,मा,जिल्हा अधिकारी चंद्रपुर, आमदार मा,किर्तीकुमार भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र ,मा,संजय हजारे जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपुर इत्यादिना निवेदन देवून शेतकऱ्यांची यस्था मांडली आहे,
"" प्रतिक्रिया ""
सि,जे,चेन्नुरवार ,तलाठी नाग भिड
साजा मधील शेतकरी बांधवानी व्यवस्थित ई,पिक पेरा मोबाइल अपलोड केले आहे, पण अध्याप तलाठी रेकार्ट वर माहीती अपलोड झाली नाही,पुणे वरुण सव्हेर प्राबलेम आहे,त्यांनी दुरुस्त करुण दिल्यास सर्व पिक पेरा होवून जाईल,सातबारा अद्ययावत करण्याव्यतिरिक्त सद्यस्थितीत तलाठ्याकडे शेतकऱ्यांना 2022-23 चा सातबारा उपलब्ध करून देण्याकरिता अजुन कोणतीही सुविधा तलाठ्याकडे नाही.अशी सुविधा उपलब्ध करून दिल्यास किंवा ई पीक पाहणी अँप मध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ उचित दुरुस्त्या केल्यास लवकरच शेतकऱ्यांना अद्ययावत झालेला सातबारा मिळू शकेल..
आपल्या प्रतिक्रिया द्या....