गणेश विसर्जनावेळी पुणे, मुंबई आणि कोल्हापूरसह राज्यातील अन्य शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या पोलिसांनी गाण्यावर ठेका धरला होता. त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांवर सर्व क्षेत्रातून टीका करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस महासंचालकांनी या घटनांची गंभीर दखल घेतली आहे.
याशिवाय एक मोठा निर्णय घेत उत्सवांमध्ये पोलिसांचं वर्तन कसं असावं, याबाबत एक नियमावलीच जारी केली आहे. त्यामुळं आता गणेश विसर्जनावेळी नाचणाऱ्या पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. पोलिस महासंचालक रजनी सेठ यांनी नवीन निर्देश काढले आहेत.पोलिसांनी वर्दीमध्ये नाचू नये, पोलिसांनी गणवेशाच्या बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पोलिसांनी वर्दी मध्ये मिरवणूकीत नाचू नये, तसेच पोलिसांनी महिलांचा अपमान करू नये. पोलिसांनी असामाजिक घटकांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये. असे राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.