भंडारा:-प्रवाशांना बसवून मार्गस्थ असलेल्या एसटी बसला एका भरधाव वेगातील टिप्परने मागून धडक मारल्याची घटना महामार्गावरील महात्मा फुले कॉलनीजवळ रविवारी घडली. या घटनेत एसटीचे नुकसान झाले. नरेश क्रिष्णा झंझाड (वय ३४, रा. लावेसर) हे आपल्या ताब्यातील बसमध्ये प्रवासी बसवून नागपूरवरून भंडाराकडे येत असताना टिप्पर क्रमांक (एमएच ४० सीएम ९००१) च्या चालकाने आपल्या ताब्यातील टिप्पर लापर्वाइने तसेच भरधाव वेगाने चालवून एसटी बसला मागून धडक मारली. यात एसटी बसचे नुकसान झाले असले, तरी प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. तसेच अपघातानंतर चालक टिप्परसह पळाला. या प्रकरणी एसटी वाहन चालकाच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन, भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस हवालदार खान करीत आहेत.