लोकशाही निवडणुकांना अतिशय महत्व असते लोकांनी लोकांनसाठी चाललेल्या शासनास लोकशाही म्हणतात.लोकशाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मतदान पध्दतीने लोकप्रतीनीधी निवडले जात असतात.जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात नांदत आहे असे म्हटले जाते.
निवडणूका निर्भय,निःपक्ष पाडल्या जाव्या म्हणून भारतात निवडणूक आयोगाची स्थापना केली गेली.परंतू निवडणूक आयूक्तांची निवड बदली,पदोन्नती सरकार करत असल्याने निवडणूक आयुक्त राजकारण्याच्या हातातील बाहुले बनल्याचे अनेक उदाहरणे आहेत,भारतात निवडणुका निःपक्ष, निर्भय वातावरणात पार पाडल्या जाव्या अशी अपेक्षा जरी असली तरी अनेक ठिकाणी मतदारावर दबाव टाकते,मतदान केंद्र ताब्यात घेणे,पैश्याचे प्रलोभन देणै असे अनेक प्रकार घडत असल्याने निवडणूक आयोगाला दुबार मतदान घ्यावे लागत असल्राने निवडणूक आयोगा समोर मोठी डोकेदुखी होती.तसेच सरकारी कर्मचारीही निवडणूकीत अप्रत्यक्ष सहभाग घेत,प्रचार करत असल्याने निःपक्ष निवडणूका घेणे निवडणूक आयोगा समोर मोठे आव्हान असे.
भारताचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून तिरूनैलै नारायण अइयर शेषन यांनी निवडणूक आयुक्त म्हमून सुत्रे हाती घेतली ते १२डिसेबर १९९०ते ११डिसेबर १९९६ पर्यंत भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते.त्यानी निवडणूक प्रक्रीयेत आमुलाग्र बदल करून आदर्श आचार संहिता लागू केली.त्यांनी आचार संहिता भंग करणा-यावर कार्यवाही सपाटाच लावला होता,त्यांनी राजकारण्याना मदत करणा-या प्रशासनातील अनेक बड्या अधिका-यांना निलंबीत केले त्यामुळे त्यांचे राजकारण्यांशी अनेकदा खटके उडाल्याचे पाहवयास मिळाले आहे."*लालु प्रसाद यादव तर म्हणायचे शेषन को संसारावर चढाकर गंगाजी मे हेला देगे*" त्यांच्या कार्यकाळातच मतदारांना निवडणूक ओळखपत्र बनवून वाटण्यात आले त्यामुळे बोगस मतदान टाळता आले. टि.एन.शेषन यांचे नाव जरी घेतले तरी राजकारणी,सरकारी कर्मचारी यांची पाचावर धारण बसायची.
त्यांनी निवडणूक कार्यक्रम झाल्यापासून उमेदवारी अर्ज मागे घेई पर्यत कोणत्याही राजकीय अथवा अराजकीय व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाचा झेडा लावता येणार नाही.बॅनर पोस्टर लावता येणार नाही.लावलेले हटविण्यात येईल कोणत्याही कोणत्याही पक्षाचा प्रसार माध्यमांवर प्रचार करता येणार नाही.नविन पदभरतीची जाहिरात देता येणार नाही.त्याचे नाव अनेक किस्से नाही,जाहीर सभा घेता येणार नाही.मतदारावर प्रभाव पडेल असे निवडणूक आयोगाच्या परवानगी शिवाय कोणत्याही अधिकारी,कर्मचारी यांची बदली करता येणार नाही असे बंधन राज्यकर्ते,तथा प्रशासनावर लावले होते टी.एन.शेषन यांचे नाव जरी घेतले तरी एखाद्या कर्मचा-यास ह्रदयविकाराचा झटका येईल अशी त्यांची दहशत होती. आचार संहिता लागू झाली की टि.एन.शेषन निवडणूक आयुक्त असतानाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. देशात आदर्श आचार संहिता लागू करून निवडणूका निर्भीड,निःपक्ष वातावरणात पार पाडून भारतात लोकशाही मजबुत करणा-या टी.एन.यांना विनम्र अभिवादन.
*लेखक :रितेश हरीष पवार*
*वसंत विचारधारा मंच महाराष्ट्र*
*संकलन व संपादन : संजय कडोळे,अध्यक्ष : महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद, कारंजा (लाड) जि. वाशिम.*
(टिप : लेखक युवा पत्रकार असून,संविधानाचे अभ्यासक तसेच भटक्या विमुक्त चळवळीतील जुने जाणते कार्यकर्ते आहेत.ते सर्वच न्यायालयात स्वतःचा युक्तीवाद स्वत:च करतात)
आपल्या प्रतिक्रिया द्या....