कुरखेडा शहरातील कुंभीटोला मार्गावर नदीजवळ अवैध दारूविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने घटनास्थळी भेट देऊन १० लिटर मोहफुलाची दारू जप्त करीत संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई तळेगाव येथे करण्यात आली. येथील एका विक्रेत्याकडून ५० लिटर मोहफुलाच्या दारूसह ५० किलो मोहफुलाचा सडवा जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सदर कारवाई ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ना. पो. शि. संतोष कांबळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे कार्यकर्ते विनोद पांडे उपस्थित होते.