भारतीय प्रजासत्ताकात पत्रकाराला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते.आणि हा चौथा आधारस्तंभ स्वयंस्फूर्तीने केवळ स्वतःच्या बळावर उभा असतो.दुदैवाने याला ना शासनाचे बळ असते,ना पोलीस संरक्षण,ना शासनाचा कोणताच आर्थिक आधार.परंतु तरीही पत्रकार स्वबळाने,स्वतःच्या मेहनतीने,स्वतःच्या पैशाने अविरतपणे तन-मन-धनाने देशसेवा आणि समाजसेवा करून,लोकशाही जीवंत रहावी. टिकून रहावी.बळकट रहावी.तसेच समाजातील अन्याय-अत्याचार दूर व्हावा.व ज्याचे न्याय्य हक्क त्यालाच मिळावेत.यासाठी अविरतपणे कार्यरत असतो.माझ्या मते तर, आजच्या स्वार्थी जगात,निःस्वार्थ निष्पक्ष समाजसेवा करणारा पत्रकाराशिवाय दुसरा कुणी असेल असे मला तरी वाटत नाही.परंतु स्वतःच्या आरोग्यावर,कुटुंबावर,घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवेकरीता जीवन जगत असलेल्या अशा निःस्वार्थ व्यक्तिला शासनाकडून काहीच सहकार्य मिळू नये याचेच आश्चर्य वाटते.केवळ "लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ" म्हणून त्याला हरभर्याच्या झाडावर चढवून,त्याचेकडून आपले इप्सिप्त (स्वार्थ) साधण्याचे काम स्वतः आपले शासन,धूर्त राजकारणी नेते आणि समाजाकडून सुरु असते.आणि त्यांना त्यांची हवी तेवढी स्तुती,त्यांच्या कार्याची वाहवा,प्रसिद्धी पत्रकाराकडून "फ्री ऑफ चार्ज"मध्ये मोफत हवी असते.पत्रकारांना बातमी संकलनाकरीता,बातमी बनविण्याकरीता,प्रसिद्ध करून आणण्याकरीता एखाद्या चाणाक्य वकीलापेक्षा निश्चितच कितीतरी पटीने जास्त बुद्धी वापरावी लागते.स्वतःच्या आयुष्यातील (जीवनातील)कितीतरी वेळ द्यावा लागतो.मात्र याचा विचार,पत्रकाराचा गुणगौरव, आणि पत्रकाराच्या अनमोल कार्याचा मोबदला त्याला मिळायलाच हवा.याची जाणीव,शासन-राजकीय नेते किंवा समाज कधीच करीत नाही.स्वतःच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत तळागाळात राहूनच त्याच्या संसाराचा रहाटगाडा त्याला ओढावा लागतो.शिवाय केव्हा केव्हा तर समाजातील क्रूर (हिसंक),भ्रष्टाचारी नेत्यां विषयी बंड केल्यास,पत्रकार स्व.गौरी लंकेश यांच्याप्रमाणे बलिदानही द्यावे लागते. आपल्या भविष्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी सदैव दक्ष राहीलं पाहीजे.पत्रकार जर एकसंघ राहीले तर त्यांना,भ्रष्टाचारी परिस्थितीशी मुकाबला करणे सोपे जाते.पत्रकार हा लहान असो की मोठा,दैनिकाचा असो की साप्ताहिकाचा,ज्येष्ठ अनुभवी असो की नवोदीत त्यांनी आपआपसात संवाद ठेवला पाहीजे.एकमेकांना सांभाळून घेतलं पाहीजे.एकमेकांचा राग,द्वेश,जळतोळेपणा व एकमेका विरूध्द लावालावी, चुगलखोरी,निंदानालस्ती करीत एकमेकांविरुद्धच झगडत राहिल्याने पत्रकारांचीच हानी आणि बदनामी होते.त्यामुळे एखाद्यावर काही संकट आल्यास वेळप्रसंगी एकमेकांचे पटतच नसले तर एकमेकांच्या सहकार्याला कुणी जात नाही. परंतु हे वेळ आपल्यावर का यावी ? याचे सिहावलोकन करून पत्रकाराने भविष्याकरीता आपल्या वागण्यामध्ये सुधारणा करून घेतली पाहिजे.संकटे ही सांगून येत नसतात.पत्रकारावर केव्हा केव्हा राजकिय व्यक्ती, अवैध व्यावसायिक किंवा गावगुंडांकडून हमले होऊ शकतात.काहींना कौटूंबिक अडचणी उद्भवतात. तर काहींना आरोग्यांच्या तक्रारी व समस्या उद्भवू शकतात.अशा वेळी जर नवे जुने सर्व पत्रकार एकसंघ असतील तर आपण संकटात असलेल्या आपल्या सहकार्याला तन-मन-धनाने सहकार्य करून त्याला संकटातून सोडवून,प्रसंगी जीवदान सुध्दा करू शकतो.व एखाद्याला जरी दुर्धर आजारातून आपण वाचवू शकलो तरी आपल्या जीवनातील ती फार मोठी उपलब्धी ठरत असते. त्यामुळे कोणत्याही संकटात असलेल्या आपल्या पत्रकाराला आपात्कालिन मदत मिळावी म्हणून पत्रकार संघटन,पत्रकारांचे ऐक्य असणे फार महत्वाचे आहे.व आजच्या आपात्कालिन परिस्थितीत गरजेचे आहे.
लेखक : संजय कडोळे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त.) संपादक : साप्ता.करंजमहात्म्य. गोंधळीनगर,कारंजा (लाड) जि.वाशिम.मो. 9075635338