वाशिम : "वृद्ध साहित्यीक कलाकार" सुद्धा समाजाचा महत्वपूर्ण घटक असून, पत्रकारांप्रमाणेच केन्द्र शासन व राज्य शासनाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती आणि मनोरंजनातून समाजप्रबोधन करीत व्यसनमुक्ती सेवाकार्य करीत असतात. परंतु समाजसेवेकरीता अख्खे आयुष्य वेचणाऱ्या साहित्यक कलाकारांची वृद्धापकाळी परवड होत असते.त्यामुळे त्यांच्या वृद्धापकाळी उदरनिर्वाह व औषधोपचाराची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून, "वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन योजना" राबवली जाते.परंतु वाढत्या अगडबंब महागाईपुढे वृद्ध कलाकारांना आजतागायत अत्यंत तुटपुंजे मानधन मिळत होते त्यामुळे दि 3 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या विदर्भ लोककलावंत संघटना आणि संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात तत्कालिन आमदार राजेंद्र पाटणी तथा विधान परिषद आमदार ॲड किरणराव सरनाईक यांना विदर्भ लोककलावंत संघटनेने लोकप्रतिनिधींना वृद्ध कलाकार मानधन वाढीसाठी विधानसभेत लक्ष्यवेधी मांडण्याची सूचना केली होती. शिवाय सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार तथा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांचेकडे कलाकार मानधन वाढीकरीता वेळोवेळी विदर्भ लोककलावंत संघटना, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, महाराष्ट्र राज्य शाहीर समाजप्रबोधनकार परिषद आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ति पुरस्कार संघटनेने अथक प्रयत्नातून पाठपुरावा केला होता शिवाय दि 24 जानेवारी 2024 रोजी लोककलावंताचे निर्णायक असे क्रांतिकारी धरणे आंदोलन केले होते. त्यामुळे अखेर सार्वत्रिक निवडणूकाच्या पार्श्वभूमिवर, शासनाने. दि.16 मार्च 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत, "वृद्ध साहित्यीक कलाकार मानधनामध्ये सरसकट पाच हजार रुपये वाढीचा निर्णय मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्याकडून जाहीर करण्यात आला. मानधनात वाढ झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य शाहीर समाजप्रबोधनकार परिषदेचे शाहीर विजय पांडे अकोला, शाहीर शिवाजीराव शिंदे अहिल्यादेवी होळकर नगर, सत्यपाल महाराज चिंचोलीकर, अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदे मुंबईचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर, महाराष्ट्र राज्य रंगभूमि परिक्षण मंडळाचे रविन्द्र नंदाने, हभप श्रीकृष्ण महाराज राऊत, लोमेश पाटील चौधरी इत्यादींनी, "वृद्ध कलावंताना करण्यात आलेली वाढ म्हणजे विदर्भ लोककलावंत संघटनेच्या यशस्वी आंदोलनाचे फलित असल्याचे म्हटले आहे.व त्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांचे अभिनंदन केले आहे."