वाशिम : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) “शासन आपल्या दारी” या उपक्रमातून जिल्हयातील 75 हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ देण्यात येणार आहे.विविध यंत्रणांनी या उपक्रमासाठी नियोजनपूर्वक काम करावे. जिल्हयातील कोणताही पात्र लाभार्थी हा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे. लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी लाभार्थ्यांची निवड करुन त्यांच्या याद्या तयार ठेवाव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज 30 मे रोजी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीचा आढावा विविध यंत्रणेकडून आयोजित सभेत घेतला. यावेळी षण्मुगराजन बोलत होते.सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांची मुख्य उपस्थिती होती.
षण्मुगराजन म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योजनादुतांकरीता ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी ॲप विकसीत करण्यात आले आहे.संबंधित यंत्रणांनी गावपातळीवर काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती त्या ॲप्समध्ये नोंदवावी.गरजू लाभार्थ्यांना योजनांची माहिती देवून त्यांना लाभ देण्याच्या दृष्टिने ॲप्समध्ये माहिती भरावी असे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी विविध यंत्रणेमार्फत लाभ देण्यासाठी निवड करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या माहितीचे सांख्यिकीय सादरीकरण केले.या सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे,संजय जोल्हे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी,जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड, कृषी विकास अधिकारी गणेश गिरी,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर,लक्ष्मण मापारी,महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक बालुरे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, रेशीम विकास अधिकारी फाळके,उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर (वाशिम),ललीत वऱ्हाडे (कारंजा) यांच्यासह,सर्व तहसिलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व तालुका कृषी अधिकारी व सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....