ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव बुज येथे आज दिनांक ३१ डिसेंबर २०२२ ला वाघांच्या हल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली.
सविस्तर माहिती तोरगाव बुज येथील सीताबाई सलामे वय ६० वर्ष रोज प्रमाने सीता बाई शेतावर काम करण्यासाठी गेली आणि सांयकाळी पाच वाजता च्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला व ठार मारले. बाजुच्या शेतात काम करत असलेल्या सुने ने आरडाओरडा केला. लगेच गावातील नागरिकांनी धाव घेतली. व यांची माहिती वनविभाग यांना देण्यात आली. काही वेळातच वनविभाग व पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पण नागरिकांनी मुत्युदेह उचलु न देण्याचा पवित्रा घेतला. पोलीस व वनविभाग प्रशासना कडून ठोस आश्वासन मिळाल्या नंतर मुत्युदेह स्वछेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले.