अकोला:- आपल्या सर्वांना कळविण्यात आनंद होतो आहे की आपल्या स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा शिवछत्रपती घडावे या उद्देशाने सर्वप्रथम जिजाऊ मासाहेब घडवणे हे आवश्यक आहे,
आणि त्याच दृष्टिकोनातून 1000 युवतींच लाठी,काठी,प्रशिक्षण शिबिर आपण अकोला शहरांमध्ये दिनांक 2 एप्रिल 2024 ते 12 एप्रिल 2024या काळामध्ये करत आहोत. हे शिबिर निशुल्क राहणार आहे, आणि आज प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला प्रतिकार करणे शिकवणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने या शिबिरात मुलीला पाठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. युवतींचां खुप छान प्रतिसाद मिळत आहे. युवतींनी स्वतः ऑफीस ला येऊन फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. तरी ज्यांना आपल्या मुलींचे फॉर्म भरायचे असतील त्यांनी आपल्या ऑफिसला भेट द्यावी.