दि. 30.05.24 रोजी रात्री 09.30 वा चे सुमारास देलनवाडी येथील दोन युवक आपल्या गावाकडे जात असताना नागभिड सिंदेवाही रोडवर सावरगाव समोर वळणावर मोटर सायकल क्र. एम एच 31 केआर 6528. चा अपघात झाला. त्यातील युवक परिमल दिवाकर मरस्कोले वय. 26 वर्षे रा. देलनवाडी ता. सिंदेवाही याचा जागीच मृत्यु झाला तर दुसरा युवक मयुर वसंत गेडाम वय. 27 वर्षे रा. देलनवाडी ता. सिंदेवाही हा जखमी झाला. त्याला तात्काळ परमेश्वर मडावी यांचे रुग्णवाहिकेतून उपचारकामी नागभिड येथे पाठविण्यात आलेले आहे. आज रोजी सदर मयताचे शवविच्छेदन
करण्यात आलेले असुन जखमी नामे मयुर वसंत गेडाम हा उपचार घेवुन घरी परत आलेला आहे. सदर बाबत अकस्माक मृत्युची नोंद घेण्यात आलेली असुन पुढील तपास सुरु असुन वाहन चालक हे मद्य पिवुन वाहन चालवित असल्याबाबत माहीती मिळालेली आहे. त्यांचे वाहनावरिल निंयत्रण सुटुन मोसा घसरुन अपघात झालेबाबत प्राथमीक दृष्ट्या तपासात दिसुन येत असले तरी ईतर वाहनामुळे अपघात झाला की काय याबाबत सुद्धा पुढील तपास तळोधी बा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अजित सिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.