युवा महिला किर्तनकार हभप शिवलिलाताई पाटील ह्या आपल्या सुमधूर वाणीतून किर्तन सादर करीत असतांना, छत्रपती शिवरायाच्या शिवचरित्रावर विशेष भर देऊन, शिवचरित्रा मधील संवादाची पहाडी आवाजात विशेष मांडणी करून समाजप्रबोधन करीत असतात . शिवाय प्रसंगी विनोदांची उधळण करीत रसिक श्रोत्यांना खळखळून हसवीतात. त्यामुळे त्यांच्या रसिक श्रोत्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे . शिवाय झी टॉकीज वरील गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या मालिके मधून आणि युट्युबवरून त्यांच्या किर्तनाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळालेली असल्यामुळे त्यांचे किर्तन प्रत्यक्ष ऐकण्याची सुवर्ण संधी कारंजेकरांना, संत गजानन महाराज संस्थान कोहिनूर कॉलनी कारंजाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली असून उद्या गुरुवार दि ०९ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ०८:०० ते १० : ०० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष समोरा समोर ह्या किर्तनकाराचे किर्तन ऐकावे या जिज्ञासेपोटी त्यांच्या कोहिनूर कॉलेनी ( मानोरा रोड पसरणी फाट्याजवळ ) येथे असलेल्या, श्री संत गजानन महाराज मंदिराच्या श्रीमद् भागवतसप्ताहा मध्ये लाखो माऊली हरिभक्त भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता असून, येथे बैठक व्यवस्था आणि पार्किग व्यवस्था करण्यात येत आहे .
तरी श्री माऊली भक्त मंडळीनी शांतता, संयम व सुव्यवस्था राखण्या करीता संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे . असे वृत्त संजय कडोळे यांनी कळविले आहे .