महाराष्ट्रातील अग्रणी असलेल्या पत्रकारांच्या, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या विदर्भस्तरीय नागपूर शाखेतर्फे विदर्भ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या संघटन नेतृत्वात होणाऱ्या, दुसऱ्या विदर्भस्तरीय अधिवेशनाकरीता, वाशिम जिल्ह्याचे ग्रामिणचे अध्यक्ष सुनिलभाऊ ऐतनगरकर [फुलारी] यांच्या सक्षम अशा नेतृत्वात बहुसंख्य पत्रकार सहभागी होणार असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे . प्राप्त माहितीनुसार, येत्या रविवारी दि २४ एप्रिल २०२२ रोजी नागपूर येथील ,व्हिआयपी रोड धरमपेठ येथील, वनामती सभागृह नागपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांचे अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांचे स्वागताध्यक्ष, यांचे मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भस्तरीय अधिवेशन होणार असून सदरहु कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी कॅबीनेट मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस, माजी कॅबिनेट मंत्री रमेशचंद्र बंग राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून नागपूर शहर कॉग्रेस कमेटी अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे, आमदार राजुभाऊ पारवे, चंद्रपूर जि स मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे असणार आहेत . यावेळी सदर्हू कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली चंद्रपूर मतदार संघाचे खासदार मा. अशोकराव नेते हे करतील .सदरहु कार्यक्रमात, विदर्भ विभागीय सचिव तथा वाशिम जिल्ह्याचे दैनिक मातृभूमिचे निवासी संपादक निलेश सोमाणी व इतर आदर्श पत्रकारांचा व जिल्हाध्यक्षाचा सत्कार समारंभ तसेच स्मरणिका प्रकाशन करण्यात येईल . त्याशिवाय पत्रकारांना उचित मार्गदर्शन करण्याकरीता "पत्रकार आणि पत्रकारीता" या विषयावर दैनिक महासागरचे संस्थापकिय संपादक श्रीकृष्णजी चांडक यांचे अध्यक्षतेखाली , माहिती जनसंपर्क विभाग नागपूरचे संचालक हेमराज बागुल हे चर्चासत्राचे उदघाटन करतील . चर्चासत्रात दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, दै लोकशाही वार्ताचे संपादक भास्कर लोंढे , दै राष्ट्रप्रकाशचे संपादक सुदर्शन चक्रधर ह्या प्रमुख अतिथीचे उचित मार्गदर्शन मिळणार आहे . सदरहु कार्यक्रमाचे आयोजन वाशिम येथील दैनिक विदर्भ मतदार वृत्तपत्राचे संपादक असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब देशमुख तथा पूर्व विदर्भाचे अध्यक्ष प्रा महेश पानसे व त्यांच्या कार्यकारिणीने केले आहे . तरी सदर्हु अधिवेशनाला वाशिम जिल्ह्यातून जास्तित जास्त पत्रकारांनी उपस्थित राहून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचे आवाहन वाशिम ग्रामीणचे अध्यक्ष सुनिलभाऊ [ ऐतनगरकर ] फुलारी यांनी केले असल्याचे वृत्त प्रसार माध्यमाला कळवीतांना महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांनी कोरोना महामारी कालावधी नंतर दोन वर्षाने चंद्रपूर अधिवेशनानंतर होऊ घातलेल्या या अधिवेशनाला सुनिल ऐतनगरकर [ फुलारी ] यांच्या आवाहनानुसार बहुसंख्य पत्रकार सहभागी होणार असल्याचे सांगीतले आहे .