कारंजा :- दिनांक 19 जून रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजेंद्रजी पाटणी साहेब यांचा कारंजा येथील दौरा खालील प्रमाणे आहे.
कारंजा येथील नगर परीषद हद्दीतील हटोटीपूरा येथे दुपारी 4.30 वाजता प्रभू स्वामी मठाच्या सभागृहाचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन, दत्त मंदिर येथे दुपारी 5 वाजता काळा मारुती मंदिराचे सभागृह बांधकाम करणे या कामाचे, दुपारी 5.15 वाजता नेहरू चौकात दत्त चौक ते टिळक चौक ते नेहरू चौक रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व नाली बांधकाम करणे या कामाचे, दुपारी 5.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे हनुमान मंदिराचे सभागृहाचे बांधकाम करणे या कामाचे, सायंकाळी 6 वाजता भगतसिंग व्यायाम शाळा येथे भगतसिंग व्यायाम शाळा सभागृहाचे बांधकाम करणे, संध्याकाळी सहा 6.30 मिनिटांनी कांचन विहार येथे हिंगणघाट ते देशमुख चतुरकर ते पांडे ते मंदिर लाहोटी ते ते अग्रवाल ते ठाकरे ते ते मुर्तीजापुर रोड पर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे, सायंकाळी सहा 6. 45 वाजता येथील एस के फंक्शन हॉल ते नागपूर हायवे पर्यंत डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन करणार आहेत.