वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) यशोदा महिला महाविद्यालय नागपूरचे प्रा.डाॅ.प्रकाश सोनक यांचें कर्करोगाने,मंगळवार दि 11 जुलै 2023 रोजी दुःखद निधन झाले. दि 12 जुलै रोजी त्यांची अंत्ययात्रा जयप्रकाश नगर येथून निघून मोक्षधाम नागपूर येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या परिवारात त्यांचे मागे गृहीणी असणारी पत्नी व दंत महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेली एकूलती एक मुलगी आहे.गेल्या दोन वर्षापासून ते कॅन्सर या आजाराशी कॅन्सरयोध्दा म्हणून लढत राहिले पण यश आले नाही.ते सोनकसर सोशालाॅजीचे प्राध्यापक होते.नागपूर युनिव्हर्सिटी मधे सिनेट सदस्य होते.अनेक संस्थाशी त्यांचा जवळचा संबंध होता.आंबेडकरी चळवळीत ते हिरहिरीने भाग घ्यायचे. अतिशय प्रामाणिक,मनमिळाऊ,हजरजवाबी,कार्यतत्पर म्हणून त्यांची ख्याती होती. महत्वाचे म्हणजे तळागाळातील नागरिक आणि विद्यार्थ्याना ते सातत्याने मदतीचा हाथ द्यायचे.राष्ट्रीय कार्यक्रमाच्या जनजागृती बाबत त्यांना विशेष तळमळ होती.संस्थापक दिनेश वाघमारे यांनी स्थापन केलेल्या मदत सामाजिक संस्था नागपूरचे ते अध्यक्ष होते. "त्यांच्या निधनाने मदत सामाजिक संघटनेचे आणि आंबेडकरी जनतेचे फार मोठे नुकसान झाले.हि हानी कधीही भरुन न निघणारी आहे.मदतचे सर्व सहकारी यांचे कडून मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो." अशा शब्दात त्यांचे निकटवर्ती दिनेश वाघमारे यांनी आपल्या शोकसंवेदना प्रगट केल्या आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कारंजा शहरात धडकताच विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,रामबकस डेडूळे,नंदकिशोर कव्हळकर,पांडूरंग माने,मोहित जोहरापूरकर,डॉ ज्ञानेश्वर गरड,रोमिल लाठीया,डाँ इम्तियाज लुलनिया,उमेश अनासाने,हभप अजाब महाराज ढळे,प्रदिप वानखडे,विजय खंडार इ नी शोकभावना प्रगट केल्या आहेत.