कारंजा (लाड) : सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाकडून, वैदर्भिय भूमितील,सप्तखंजेरी समाज प्रबोधनकार यांना डावलून समाज प्रबोधनकार लोककलावंत व समाजसेवकाच्या न्याय्य हक्काचा "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" दिग्गज चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर केल्याबद्दल,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड)कडून गुरुवार दि.01 फेब्रुवारी 2024 रोजी कारंजा तहसिल कार्यालय येथे निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला.यावेळी कारंजा येथील विविध संघटनाचे पदाधिकारी, समाजसेवक,पत्रकारांची लक्षणिय उपस्थिती होती.यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे व असंख्य लोककलाकार,गुरुदेव सेवा मंडळाचे गजाननराव अमदाबादकर,संतोष केळकर, विजय खंडार,तुकाराम गजभार, पत्रकार उमेश अनासाने,ज्ञानेश्वर खंडारे, महादेवराव ठोंबरे, पत्रकार दामोदर जोंधळेकर, विनायक पद्मगिलवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष हाजी रऊफ खान, शाहीर देवमण मोरे, रोहित महाजन, बाळकृष्ण काळे, शेषराव इंगोले, श्रीकांत मोडक, कैलास हांडे, विजय निलख,अभा मराठी नाटय परिषदेचे समन्वयक अश्विन जगताप,चित्रपट दिग्दर्शक गोवर्धन कृपलानी, डॉ.गजानन गावंडे इत्यादीची उपस्थिती होती.