वाशिम : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, शिवसेना शहरच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरप्रमुख डॉ. विशाल सोमटकर हे होते. यावेळी शहरप्रमुख डॉ. विशाल सोमटकर व पदाधीकाऱ्यांनी शुक्रवार पेठ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. विशाल सोमटकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्यादेवी होळकर. सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आपण घेऊन त्यांच्या कार्याला उजाळा दिला पाहिजे." यावेळी वाशिम शहर शिवसेनेचे शाम खरात, सुधाकर कुटे, सुरिंदरसिंग सेठी,अब्दुल आकीब, मदन भडके, राजु पुणेवाड, संदिप कांबळे,जगदीश गाभणे, अक्षय घुगे,मदन भडके,संतोष श्रीमंत, संतोष इंगोले,अकाश धुळधुळे, गोपाल सारसकर, ऋतीक दामोदर आदिंसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते. अशी माहिती शिवसेना शहर कार्यालय वाशिम कडून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.