कारंजा (लाड) : समाजातील स्त्री आणि पुरुषांप्रमाणे "किन्नर" हा देखील समाजाचा महत्वाचा घटक असतो.अगदी द्वापारयुगातील रामावताराच्या आणि त्रेता युगातील कृष्णावतारच्या काळातील महाभारत युद्धातही किन्नरांची विशेष भूमिका होती.त्यामुळे किन्नराविषयी नेहमीच समाजात श्रद्धेचे स्थान असते.अशा "किन्नर" व्यक्तीकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन मानवता आणि सहानुभूतीचाच असला पाहीजे.माणसाने किन्नराचे मन केव्हाच दुखवू नये.कारण किन्नरांचा श्राप खूपच वाईट असतो.तर एखाद्या व्यक्तीला किन्नराचा आशिर्वाद जर मिळाला तर तो "रंकाचा राव" होतो.असे म्हणतात.एवढे सामर्थ्य ह्या किन्नराच्या आशिर्वादात दडलेले असते.
साधारणत : बाळाचा जन्म झाल्यावर आणि शुभ विवाह प्रसंगी किन्नर हक्काने आशिर्वाद देण्यासाठी जात असतात.किन्नर हे समाजातील व्यक्तीकडे,आपल्या उदरनिर्वाहाकरीता इनाम,बक्षीस किंवा दक्षिणा म्हणून पैसे मागीत असतो.परंतु याउलट एखाद्या व्यक्तीला जर किन्नराने स्वेच्छेने पैसे दिले तर त्या व्यक्तीचे भाग्यच बदलून जात असल्याची समाजामध्ये भावना आहे.कारंजा शहरामध्ये श्रावणी हिंगासपूरे नावाची किन्नर असून,येथील प्रत्येक धार्मिक व सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी सिंहांचा वाटा दिसून येतो.कारंजा शहरामधील प्रत्येक सण आणि उत्सवात एखाद्या बड्या नेत्याला किंवा धनाढ्य व्यक्तीलाही लाजवेल अशा प्रकारे त्यांचे सामाजिक कार्य आहे.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दि. 13 ऑक्टोंबर 2024 रोजी,श्रीनवदुर्गोत्सव विसर्जन मिरवणूकीतील श्री नवदुर्गा मंडळ व सहभागी भाविक व प्रेक्षकांच्या क्षुधा शांती आणि सेवेसाठी त्यांनी भव्य अशा महाप्रसादाची व पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था,श्री शनि मंदिर संस्थान परिसरातील नेवी पूरा भागात असलेल्या त्यांच्या निवासस्थाना समोर पेंडॉल टाकून केली. महाप्रसादाचा हा कार्यक्रम श्री नवदुर्गा विसर्जना निमित्त मंगळवारी सकाळी 11:00 वाजता सुरु करण्यात आला असून,उशीरा रात्री 10:00 वाजेपर्यंत चालणार असल्याचे त्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना दिलेल्या मुलाखतीत सांगीतले.तसेच यावेळी कारंजा शहरातील मिरवणूकीत सहभागी झालेल्या सर्वच श्री नवदुर्गा मंडळांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, वारकरी मंडळ व साधु संताचा श्रावणी किन्नर ह्या शाल,श्रीफळ व रोख रक्कमेचे पाकीट देवून सत्कार करीत आहेत. त्यांच्या ह्या उपक्रमा मधून त्यांच्या दानशूर अशा स्वभावाची प्रचिती वेळोवेळी कारंजेकरांना येत असते. विशेष म्हणजे श्रावणी हिंगासपूरे किन्नर अतिशय शांत, हास्यमुख,प्रामाणिक व प्रेमळ स्वभावाच्या आहेत.त्यांच्या ह्या स्तुत्य अशा उपक्रमाचे कारंजेकरांकडून अभिनंदन होत असून प्रत्येक श्री नवदुर्गा मंडळा मध्ये त्यांच्या समाजसेवी उपक्रमाची चर्चा होत आहे.