कारंजा : विधानसभा निवडणूका जाहिर झाल्या असल्याने,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघावर दावा ठोकण्याकरीता, सध्या पर जिल्ह्यातील बाहेरगावचे अनेक इच्छुक उमेद्वार तळ ठोकून बसलेले आहेत.आजतागायत या मतदार संघात बाहेरगावचेच आमदार झाल्याचा अभ्यास त्यांनी केलेला असून,येथील दहापाच व्यक्तींना हाताशी धरून येथील मतदारांना भुलवीता जाऊ शकते.असा कयास त्यांनी बांधला आहे.व त्यामुळे केवळ आणि केवळ कारंजा मानोरा मतदार संघातील मतदारांना एकदा का आपण संमोहीत केले की,येथील विधानसभा निवडणूक जिंकणे सोपे असा त्यांचा समज झाला असून,एकदा का आमदार झालो की,आपला स्वतःचा विकास करायला मोकळे.हे स्वप्न त्यांनी ऊराशी बाळगले आहे. मग पुढे कारंजा मानोरा मतदार संघाचा विकास गेला चुलीत ! स्वतःचा स्वार्थ साधला की पुरे झाले. अशीच नितीमत्ता ते बाळगून आहेत.निदान आपल्या कारंजा मानोरा मतदार संघाच्या समस्या काय आहेत ? कोणत्या आहेत ? येथील नागरीकांच्या कोणकोणत्या अडचणी आहेत ? ते तरी बाहेरगावच्या या उमेद्वारांना माहिती आहे काय ? व त्या अडचणी सोडविण्यास निवडणूकीतील उमेद्वार बांधील राहणार काय ? कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात उच्च महाविद्यालये आणून येथील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची समस्या,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उभारून येथील कामगार मजूरांचा प्रश्न सोडविण्यासाठी या दोन्ही तालुक्यात उद्योग कारखाने आणण्याची व येथील बेरोजगारांना रोजगार देण्याची, राष्ट्रियकृत बँकाव्दारे व्यवसायाकरीता कर्जपुरवठा मिळवून देण्याची,ऐतिहासिक व पौराणिक अशा तिर्थक्षेत्र कारंजा शहराला अ श्रेणी तिर्थक्षेत्र दर्जा अविलंब मिळवून देत शहराचा विकास तिर्थक्षेत्र आराखड्या प्रमाणे करण्याकरीता वचनबद्ध राहणार काय ? येथील सोहळ काळविट अभयारण्याचा विकास, ताडोबा व्याघ्र अभयारण्याच्या धर्तीवर विकास करून अभयारण्य पर्यटकाकरीता खुले करून देत ग्रामिण गावखेड्यातिल ग्रामस्थांना लघुव्यवसाय,स्वयंरोजगार मिळवून देणार काय ? याबद्दल हे बाहेरगावचे उमेद्वार आपला जाहिरनामा स्टॅम्प पेपरवर लिहून देत कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील नागरीकांशी प्रामाणिक राहतील काय ? याचा खुलासा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील उमेद्वारांनी करावा. व मतदार संघातील भोळ्या भाबळ्या नागरिकांना आश्वस्थ करावे.असे खुले आव्हानच,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त जनसेवक संजय कडोळे यांनी बाहेरगावच्या इच्छुक उमेद्वारांना दिले आहे. आता बघू या माझे आव्हान स्विकारून कोणकोणते उमेद्वार स्टॅम्पपेपरवर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या विकासाची हमी लिहून देतात. याकडे स्थानिक नागरीकांचे सुद्धा लक्ष्य लागले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.