कारंजा (लाड) : वैशाखाच्या प्रखर अशा उन्हाळ्यात,उन्हाचा पारा 45 अंश सेल्सियसवर पोहोचला असून,पूर्व-पश्चिम विदर्भाच्या वातावरणात प्रथमच प्रचंड उष्णतेची लहर अनुभवायला मिळत आहे, वैशाखाचा सूर्य अक्षरशः आग ओकतोय असा भास होत असल्याचा अनुभव येत आहे. हवेत उठणाऱ्या तिव्र लहरींच्या त्या उकाड्याने अंगाची लाही भाजल्या जात आहे.त्यामुळे रस्त्याने पायदळ चालणाऱ्या किंवा टू व्हिलर वा फोर व्हिलर मधील प्रवाशी नागरीकांच्या घशाला सारखी कोरड पडत असून हे प्रवाशी " पाणी .. ! पाणी ... !" करीत आहेत.त्यामुळे प्रत्येक चौका चौकात,रेल्वे स्टेशन,बस स्थानकांवर सावलीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या शोधात वाहनं भटकतांना दिसत आहेत.मात्र आजतागायत झालेल्या वृक्षतोडीने आणि वाढलेल्या सिमेंट इमारती मुळे वाहनांनाच काय ? परंतु माणसाला देखील उभं राहायला सावली मिळत नाही.ही वस्तुस्थिती असून, तहानलेल्या जीवांना बिसलेरी बॉटल आणि थंड पेय किंवा ऊसाच्या रसावर माणसाला तहान भागवावी लागत आहे.प्रखर उन्हामुळे बिसलेरी बॉटल विक्रेते आणि थंड पेय विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत.परंतु बिसलेरी बॉटल मधील पाण्याची नेमकी गुणवत्ता काय ? बिसलेरीचे पाणी किती महिन्यांपूर्वीचे आहे ? त्या पाण्याला वापराची काही मुदत आहे किंवा नाही ? याचा सारासार विचार न करता उकाड्याने हैरान व्यक्ती तहान भागवीत आहे.मात्र पुढे प्रचंड उकाडा आणि ह्याच बिसलेरी पाण्याने एखादी रोगराई तर पसरणार नाही ना ? असा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुका व ग्रामपंचायत स्तरावर बिसलेरी पाण्याची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा अन्न व औषध प्रशासनाने कार्यरत करावी व सामान्य नागरिकांना रोगराई पासून सुरक्षा द्यावी.अशी मागणी,महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली असून, सामान्य नागरिकांनी शक्यतो उन्हामध्ये प्रवास टाळावा. पिण्यासाठी घरूनच पिण्याचे पाणी सोबत न्यावे.मिठ साखर वा ग्लुकोजचे पाणी प्यावे.सकाळी काहीतरी खावूनच घराबाहेर पडावे.भिमसेनी कापूर व पांढरा कांदा सोबत ठेवून त्याचा सुगंध घेत रहावे.उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पांढरे सुती कपडे आणि डोक्याला उपरणे बांधावे असे आवाहन केले आहे.