बोधिसत्व ,विश्वरत्न, भारतरत्न ,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री श्रावणजी बगमारे शिक्षण संस्था ब्रह्मपुरी द्वारा संचालित डॉ पंजाबराव देशमुख कान्वेंट आणि डॉ पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली .याप्रसंगी सर्वप्रथम सर्व उपस्थित अतिथी व कर्मचारी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केवळ आणि केवळ बुद्धीच्या जोरावर आपण किती असामान्य कामगिरी करू शकतो हे बाबासाहेब यांनी सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळे त्यांच्या सर्व क्षेत्रातील विचार आणि त्यांच्या धोरणांचा अवलंब करणे हे केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या आणि अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे. वंचित आणि वर्षानुवर्षापासून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या विकासाचा मार्ग बाबासाहेबांच्या विचारातच आहे आणि म्हणून सर्वांनी त्यांचे विचार अंगीकारून त्यावर कृती करून समाजाचा ,राष्ट्राचा आणि मानव जातीचा कल्याण करण्यासाठी विचार करावा असे बहुमूल्य विचार प्रा प्रकाशजी बगमारे अध्यक्ष श्री श्रावणजी बगमारे शिक्षण संस्था ब्रह्मपुरी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा कॉन्व्हेंटच्या प्राचार्य मनिषा ताई बगमारे, कॉलेजच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे आणि सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .याप्रसंगी विद्यार्थ्यांना बोलते करण्यासाठी या निमित्ताने भाषण स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. जवळपास 30 विद्यार्थ्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सुभाषचंद्र खोब्रागडे यांनी तर उपस्थितांचे आभार गोवर्धन दोनाडकर यांनी मानले