नागभिड : झाडीपट्टीतील नामवंत हास्य कलावंत सजंय बोरकर यांचा नुकताच बाला प्रितम रगंभुमी देसाईगज (वडसा)व्दारे आयोजीत " महापाप" या प्रयोगाचे उद्घाटन सोहळ्याप्रसांगी स्मृतीचिंन्ह देवून सन्मान करण्यात आला. समिंश्र नट्यकला मडंळ जनकापूर येथे आयोजित कार्यक्रमात बालाप्रितम रगंभुमिचे निर्माता निर्देशक आसासिंग जुनी, जि.प. सदस्य खोजराम मरसकोल्हे, सरपंच वैशाली गायधने, गिरिधर बोरकर, महेश रामटेके, अशिष भाकरे, पत्रकार राहुल रामटेके, आदी मान्यवराचे उपस्थितीत नटराजची स्मृतीचिंन्ह व शालश्रिफळ देवून सन्मान करण्यात आला. नागभिड तालुक्यातील गिरगाव येथिल रहवाशी असलेले सजंय बोरकर यांनी यावर्षी सर्वात जास्त नाट्यप्रयोगामधे आपली भुमीका वटवून प्रेक्षकांची मने जिंकली व बालाप्रितम रगंभुमी ची उतुंग भरारी मारण्यास मोलाचे सहकार्य केले.त्यामुळे बालाप्रितम रगंभुमीचे आसासिंग जुनी व त्याचे सर्व सहकरी कलावंतानी हास्यकलावंत सजंय बोरकर यांचे अभिनदंन केले.