कारंजा येथून जवळच असलेल्या कामरगाव येथे, संपूर्ण गावातून,प्रमुख मागाने रविवारी सकाळी, ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय कारंजाच्या वतीने, "ओम शांती आत्मनिर्भर पदयात्रा" काढण्यात आली . या पदयात्रेत कारंजा येथील ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय कारंजाच्या केन्द्रप्रमुख राजयोगीनी ब्रम्हाकुमारी मालती दिदीजी, मुर्तिजापूर येथील केन्द्रप्रमुख राजयोगीनी ब्रम्हाकुमारी आरती दिदीजी यांच्या पवित्र मार्गदर्शनात काढण्यात आलेल्या पदयात्रेत कारंजा - मुर्तिजापूर - कामरगाव व पंचक्रोशीतील खूप मोठया संख्येत सन्माननिय ब्रम्हाकुमार बंधू तथा ब्रम्हाकुमारी भगीनी सहभागी झालेल्या होत्या . पदयात्रेत ग्राम विकास, आत्मनिर्भर किसान, शेतकरी शेतमजूर आदर्श स्त्री पुरुष, परमात्म्याचे महत्व व ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या ओमशांती तत्वज्ञानाची गरज -ब्रम्हाबाबाच्या मुरलीची आवश्यकता असल्याचे महत्व गावकऱ्यांना पटवून देण्यात आल्याचे ब्रम्हकुमार प्रदिपभाई वानखडे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना मुलाखतीत कळविले आहे . तसेच त्यानंतर रात्री कामरगाव येथे आत्मनिर्भर किसान शिबीर घेण्यात आले असता शेकडो गावकऱ्यांनी शिबीरचा लाभ घेतला आहे .