ब्रह्मनगरी न्यूज ई-पेपरचे तसेच युवाक्रांती समाचार चे अकोला पत्रकार तथा प्रेस फोटोग्राफर अजय जहाँगीरदार यांची श्री कामाक्षा मंदिरला दर्शनार्थी म्हणून भेट ! कारंजा : स्थानिक श्री नृसिह सरस्वती स्वामी संस्थान तथा श्री कामाक्षा माता संस्थान कारंजा येथे आज, ब्रम्हपुरी समाचार ब्रम्हपूरीचे पत्रकार तथा गेल्या पस्तिस वर्षापासून अकोला येथील विविध नामांकित दैनिक वृत्तपत्रामध्ये प्रेस फोटोग्राफर म्हणून नावलौकिक असलेल्या, अजय जहॉगिरदार यांनी सहपरिवार दर्शनार्थी म्हणून भेट दिली असता प्रारंभी सकाळी ९:०० वाजता, श्री नृसिह सरस्वती स्वामी मंदिर येथे, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजाचे संस्थापक संजय कडोळे यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले . व त्यांना श्री च्या जन्मस्थानाची माहिती दिली . त्यानंतर अजय जहागीरदार यांनी श्री गुरुमंदिरात श्रींचा अभिषेक केला .
त्यानंतर स्थानिक श्री कामाक्षा माता मंदिरात सुद्धा त्यांनी भेट दिली . यावेळी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद तथा ज्ञानगंगा साहित्य मंडळातर्फे, कारंजा येथील शोध पत्रकार मोहम्मदभाई लक्ष्मण मुन्निवाले यांचे अध्यक्षतेखाली, श्री कामाक्षा संस्थानचे अध्यक्ष डिगांबर महाराज महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत संजय कडोळे, कैलास हांडे, दामोधर जोंधळेकर, पदमाकर पाटील कडू, रोहीत महाजन यांनी पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, तथा श्री कामाक्षा माता मंदिराची माहिती पुस्तिका देऊन त्यांचा भव्य सत्कार केला असे वृत्त श्री कामाक्षा देवी मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रोहीत महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकात कळवीले आहे .