अकोला:- अमृतकुंभाचा अंतरिम अर्थसंकल्प असे गोंडस नामकरण केलेल्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांच्या हाती भोपळा दिला आहे. लॉकडाऊन काळात ज्येष्ठ नागरिकांचे रेल्वेचे कन्सेशन काढून घेतले ते चालू करणेबाबत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अर्थ मंत्रालय, रेल्वे, मिनिस्टर, पंतप्रधान कार्यालय महाराष्ट्रमध्ये ४८ खासदार या सर्वांना ईमेल केले मात्र या अर्थ संकल्पात तरतुद केली नाही.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनक्केम डिपॉझिटच्या एक लाख दहा हजार कोटींच्या रिझर्व बँकेत पडून आहेत त्यांचा ज्येष्ठांच्या कल्याणासाठी वापर करण्यात यावा त्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केले यातून आर्थिक लाभाच्या योजनांबाबत उल्लेखही नाही. ज्येष्ठांच्या आरोग्या संदर्भात नवीन योजनांवर भर नाही भारतात १५ कोटींच्या वर ज्येष्ठ नागरिक असतांना ज्येष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही हे सर्व व्होटर्स आहेत परंतु त्याकडे डोळेझाक होत आहे.
ई पी एस पेंशनधारकाला वाऱ्यावर सोडले आहे आता बजेटवरील चर्चेत ज्येष्ठांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात यावे असे आवाहन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) अध्यक्ष अरुण रोडे यांनी केले आहे.